Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: नृत्यातून सादर होणार कहाणी फुलवा खामकरची; ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर खास परफॉर्मन्स


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनी हे विविध परफॉर्मन्स सादर करतात. नुकताच या कार्यक्रमामध्ये एक खास परफॉर्मन्स सादर करण्यात आला. या परफॉर्मन्समध्ये फुलवा खामकर यांचा कलाक्षेत्रातील प्रवास  उलघडण्यात आला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना पत्रिका पहायची की नाही यावर मतमतांतर; 'आई कुठे काय करते !'चा प्रोमो व्हायरल


Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.  लग्नाची बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले होते. आता ईशा आणि अनिश यांच्या पत्रिका पहायची की नाही यावर मतमतांतर होत आहे. याबाबत कांचताई आणि सुलेखाताई  यांच्यात चर्चा होता आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Khupte Tithe Gupte : मुहूर्त ठरला! अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' 'या' दिवशी होणार सुरू; प्रोमो आऊट


Khupte Tithe Gupte : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची गणना होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. तसेच हा कार्यक्रम कधी सुरू होणार याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर येत्या 4 जूनपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 



Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार पोहोचला; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि मंजुळा  हे समोरासमोर येणार आहे. मल्हारनं स्वराजला दिलेल्या माउथ ऑर्गनमध्ये मंजुळानं हिरे ठेवले आहेत. आता मंजुळा आणि स्वराजला काही गुंडांनी पकडले आहे. स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार तिथे गेला आहे. तिथेच मल्हार आणि मंजुळाची भेट होणार आहे. सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मल्हार हा गुंडांसोबत फायटिंग करताना दिसत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Aai Kuthe Kay Karte : "तू कमवायला लागली की सगळे चोचले कर"; कांचनताई ईशाची करणार कानउघडणी


Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नसोहळ्यानंतर मालिकेत आता ईशाच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ईशा लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या आगामी भागात ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळेल. दरम्यान "तू कमवायला लागलीस की सगळे चोचले कर", अशी कांचनताई ईशाला समज देणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा