Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.  लग्नाची बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले होते. आता ईशा आणि अनिश यांच्या पत्रिका पहायची की नाही यावर मतमतांतर होत आहे. याबाबत कांचताई आणि सुलेखाताई  यांच्यात चर्चा होता आहे. 


आई कुठे काय करते मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की,  कांचनताई या अशुतोष आणि अरुंधतीच्या घरी आल्या आहेत.  लग्न करताना पत्रिका पहायची की नाही?  या गोष्टीवर सुलेखाताई आणि कांचनताई  चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी कांचनताई या म्हणतात, 'मला माहित आजकाल कोणी पत्रिका बघत नाही पण माझा त्यावर विश्वास आहे. 'यावर हा मुद्दा मुलांच्या विरोधात जायला नको एवढंच मला वाटतं. त्या दोघांनी एकत्र आयुष्य काढायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यात जे येईल, ते त्यांनी स्विकारावं. तशी माझ्याकडे अनिशची पत्रिका आहे' त्यानंतर सुलेखाताई या अशुतोषला पत्रिका आणायला सांगतात.


पाहा प्रोमो: 






त्यानंतर अरुंधती देखील कांचनताईंबरोबर पत्रिकेविषयी चर्चा करताना दिसत आहे.  आता कांचनताई या ईशा आणि अनिश  यांची पत्रिका जुळवून पाहतील का? ईशा आणि अनिश यांच्या पत्रिका जुळतील का? या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. 


अरुंधतीच्या मते, ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं आहे की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून  आणि अरुंधतीमध्ये वाद झाला होता. 


'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे.आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात.  तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte : "तू कमवायला लागली की सगळे चोचले कर"; कांचनताई ईशाची करणार कानउघडणी