Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.  अनिरुद्धची मुलगी ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी येणार आहे. आई कुठे काय करते  मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, केळकर कुटुंब हे देशमुखांच्या भेटीला आहे आहे. यावेळी अनिरुद्ध हा अनिशला टोमणे मारत आहे.


आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  केळकर कुटुंब  हे देशमुखांच्या भेटीला आले आहे.  यादरम्यान अनिरुद्ध आणि अनिशच्या बाबांमध्ये संवाद होतो. त्यानंतर अनिरुद्ध हा अनिशला टोमणे मारतो. अनिरुद्धचे बोलणे ऐकल्यानंतर अनिरुद्धचे बाबा हे केळकर कुटुंबाला घरात यायला सांगातात. केळकर कुटुंबासोबतच अशुतोष आणि अरुद्धती देखील देशमुख कुटुंबाच्या घरी आलेले असतात. 


आता ईशा आणि अनिशच्या लग्नाची बोलणी होत असताना अनिरुद्ध काय बोलणार? ईशा आणि अनिशच्या नात्याचा स्विकार अनिरुद्ध करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.






काही दिवसांपूर्वी ईशाच्या लग्नाबाबत अनिरुद्धनं म्हणजेच  मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे. अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही.'


'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे.आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात.  तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष