Milind Gawali:  छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)   या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali)  हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. अनिरुद्धची मुलगी  ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. या मालिकेबाबत नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.  


मिलिंद गवळी यांची पोस्ट


मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे. अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही. बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे, आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही, त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरी सारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणं आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे रहा, आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरूद्ध असेही म्हणतो की , मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही , तोही अजूनही शिकतो आहे, मग एवढ धाई कशासाठी, अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही आहे कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे. पण ती अनिरुद्धची पद्धत आहे , तो वेगळा वागूच शकत नाही वेगळ्या पद्धतीने अनिरुद्ध समजावू शकत नाही.'






'मुलीवर अतोनात प्रेम करणारा , तिच्यावर जीव लावणारा , तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा हा अनिरुद्ध आता पुढे काय करतोय, हे बघायला खूपच मजा येणार आहे. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत , पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, “ आई कुठे काय करते “ही मालिकासिरीयल पहात रहा तुमचं तुम्हालाच लवकर समजेल.'


मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Madhurani Prabhulkar: 'आपल्या माणसांची काळजी...'; आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष