Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका  प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Mazhi Tuzhi Reshimgaath : रेशीमगाठ तुटणार नाही! 'माझी तुझी रेशीमगाठ'चा दुसरा भाग येणार?


Mazhi Tuzhi Reshimgaath Marathi Serial Latest Update : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या वर्षी अचानक निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांना ही मालिका पुन्हा सुरू करावी लागली. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Autograph: 'प्रेम एकवेळ संपेल पण नातं...' अंकुश आणि अमृताचा रोमान्स, ऑटोग्राफचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'या' दिवशी होणार


Autograph: 'प्रेम एकवेळ संपेल पण नातं...' अंकुश आणि अमृताचा रोमान्स, ऑटोग्राफचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'या' दिवशी होणार
Autograph: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर  होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tujhech Mi Geet Gaat Aahe :  'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत स्वराजने घालवला मल्हारचा राग; नियती आणेल का स्वराज आणि मंजुळाला एकत्र?


Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वराज  आणि मंजुळा  एकत्र येणार का?  हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये  मल्हार हा स्वराजला एक माउथ ऑर्गन  देताना दिसत आहे.


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्वीस्ट; सौंदर्याला समजणार श्वेता-कार्तिकचा डाव?


Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपासून श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहेत. पण आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं सत्य सौंदर्यासमोर येणार आहे. 


 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती-आशुतोषमध्ये जवळीक; 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या संसार नुकताच सुरू झाला असून आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये त्यांच्या जवळीक वाढलेली दिसून येईल. 


अरुंधती आणि आशुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. आता मालिकेच्या आगामी भागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील गोड संवाद आणि हळवे क्षण पाहायला मिळत आहे.



संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा