Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. यामुळे अरुंधतीचे आयुष्य बदलणार आहे. अनिरुद्ध सध्या अभीचा वापर करून अरुंधतीविरुद्ध कट रचताना दिसत आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर संशय घेण्याचं काम अनिरुद्ध अभीचा वापर करून करत आहे. 


अरुंधती आणि आशुतोषची निखळ मैत्री प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या मैत्रीपलीकडे काहीतरी आहे अशी घरच्यांना शंका होती. पण अनिरुद्ध आता अभिचा वापर करून शंकेला संशयात बदलण्याचे काम करत आहे. मालिकेत अनिरुद्ध सध्या अरुंधतीविरुद्ध कट रचताना दिसत आहे. 


अनिरुद्ध सध्या अभिच्या मनातला अरुंधतीबद्दलचा संशय वाढवण्याचे काम करत आहे. अरुंधती सध्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अनिरुद्ध आणि संजनाला अरुंधती आणि आशुतोषची निखळ मैत्री बघवत नसल्याने ते कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिरुद्ध आणि संजना अरुंधतीची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


आशुतोषचा अपघात झाल्याने अरुंधतीला मोठा धक्का बसला होता. आशुतोषचा अपघात झाल्यानंतर अरुंधतीला आशुतोषवरील प्रेमाची जाणीव झाली. तसेच अरुंधतीने नकळत मनातील भावना अनिरुद्धजवळ बोलून दाखवल्या. मालिकेत अनिरुद्धमध्ये चांगला बदल होताना दिसत होता. पण अरुंधतीला त्रास देण्यासाठी अनिरुद्ध हा प्लॅन करत असल्याचे आता समोर आले आहे. तसेच अनिरुद्धने दिलेल्या सल्ल्याचा अरुंधती विचार करून ती आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेणार का हे लवकरच प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते'च्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 


आशुतोषचा झाला होता जबर अपघात


नव्या गाण्याची आनंदाची बातमी घेऊन घरी जात असताना आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होतो. आशुतोष आणि नितीन दोघे घरी परतत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध व्यक्ती येते. त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात नितीन गाडी पटकन बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी गाडी जोरात भिंतीवर जाऊन आदळते आणि दोघांचा भीषण अपघात होतो. या अपघातात नितीनला थोडाच मार लागतो. मात्र, आशुतोषला गंभीर दुखापत होते.


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : ‘जोडीदाराची गरज वाटली तर आशुतोषचा नक्की विचार करेन!’, अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम


Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट