Ronit Roy Untold Story: अनुराग कश्यपच्या ‘उडान’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेलं टीव्ही स्टार रोनित रॉय (Ronit Roy) याने अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. पण, टीव्ही स्क्रीन गाजवणारा हा अभिनेता मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी चक्क बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. एका मुलाखतीदरम्यान रोनितने स्वतः याचा खुलासा केला होता की, त्याने दोन वर्षे आमिर खानचा (Aamir Khan) बॉडीगार्ड म्हणून काम केले होते. याविषयी सांगताना रोनित म्हणाला, 'याबद्दल बोलायचे नाही, कारण अनेकांना वाटते की मी केवळ प्रसिद्धीसाठी मोठ्या कलाकारांचे नाव वापरत आहे. पण, ती दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्षे होती. आमिर खान त्याच्या कामासाठी खूप मेहनत घेतो.’


रोनित पुढे म्हणाला, 'मला नेहमीच स्टार व्हायचे होते. 15 वर्षात मला कळले की, मी केवळ स्टार बनण्यासाठीच मुंबईत आलो आहे. मला त्या मोठ्या गाड्या हव्या होत्या आणि मुलींच्या तोंडी माझे नाव हवे होते. दरम्यान, मी 5-6 वर्षे कामही केले नाही. तेव्हा मला जाणवलं की, अभिनेता असण्याचा स्टारडमशी काहीही संबंध नाही.’


आमिर खानने मदत केली!


रोनित म्हणतो, ‘सुदैवाने मी आमिर खानसाठी दोन वर्षे काम केले. मी त्याचा बॉडीगार्ड होतो. माझ्याकडे काम नसल्यामुळे मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली. याकाळात मला आमिर खानसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. समर्पण आणि मेहनत काय असते हे मी त्याच्याकडून शिकलो. आमिर खानने मला अनेक प्रकारे मदत केली. त्याने माझ्यासाठी या क्षेत्राचे दरवाजे उघडले. त्यानंतर मी मोठ्या गाड्या आणि घर मिळवण्याची हौस सोडून दिली. मला माझी कला शिकायची होती. त्यावेळी एकता कपूरने माझ्या आयुष्यात दोन मोठे शो आणले. मी तेव्हाही शिकत होते आणि आजही नवीन गोष्टी शिकत आहे, हे चक्र आजही सुरू आहे.’


या काळात रोनितला अनेकदा अपमानास्पद बोलणीही ऐकावी लागली होती.


इंडस्ट्रीत पाय रोवत असताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या, असे विचारले असता रोनित म्हणाला, ‘एकदा माझ्या मॅनेजरला म्हटलं गेलं होतं की, आम्ही रोनित रॉयला का कास्ट करावं? त्याच्यापेक्षा ज्युनियर कलाकार चांगले आहेत. त्यावेळी मला त्यांच्या बोलण्याचा उद्देश समजला नाही. पण, आज मला त्याचा अर्थ कळला की, त्याला काय म्हणायचे होते. ही गोष्ट आठवली की, आजही वाईट वाटतं.’


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :