एक्स्प्लोर

'कपडे काढ अन् नाच...' सेटवर भयंकर घडलं; प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीसोबत गैरवर्तणूक, नेमकं काय घडलं?

Tanushree Dutta Recalls Disturbing Incident from Film Set: अभिनेत्री तनुश्री दत्तानं एका प्रसिद्ध दिग्दर्शकावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

Tanushree Dutta: अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या थेट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिनं अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 2018 साली अभिनेत्री #MEE TOOमुळे चर्चेत आली होती. या मोहिमेअंतर्गत तिनं सिनेसृष्टीतील अनेकांची पोलखोल केली होती. तसेच अभिनेता नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान, तनुश्री दत्ता पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. तिनं नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शकावर गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला आहे. या दिग्दर्शकानं अश्लील मागणी केल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. दरम्यान, तिनं या मुलाखतीतून दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केला नाही.

तनुश्रीनं पिंकव्हिलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले. तनुश्री दत्ता म्हणाली, "हे प्रकरण चित्रपटाच्या सेटवर घडलं. त्याला मी, तू इतका मोठा दिग्दर्शक नाहीस, मग तू इतका उद्धट बोलतो आहेस? असा प्रश्न उपस्थित केला. यावर, कपडे काढ आणि नाच, असं त्यानं उत्तर दिलं. मला गाऊनला काढायचे होते. हेच तो योग्य पद्धतीने सांगू शकला असता. पण त्यावेळेस मी गप्प राहिले. त्या काळात मी खूप शांत होती. पण उपस्थित कलाकारांनाही तेव्हा वाईट वाटले होते. सर्वांना वाईट वाटले होते", असं तनुश्री म्हणाली.

मी त्याच्याविरोधात आवाज उठवला

"आता #MEE TOO मोहिमेदरम्यान, कुणीही कुणीही समोर येऊन बोलले नाही. परंतु, त्यावेळेस मला सर्वांनी पाठिंबा दिला होता. म्हणूनच दिग्दर्शकही गप्प राहिला होता. त्याची एक वाईट सवय आहे. त्याला मुलींसोबत कसे वागावे हे माहित नाही", असं तनुश्री म्हणाली. "तो पोशाख जरा अंगप्रदर्शन करणारं होतं. त्या गाण्यासाठी मला पाण्याखाली नाचायचे होते. दिग्दर्शकाने मला कपडे काढून नाचण्यास सांगितले होते. एखादी अॅक्ट्रेस किंवा मिस इंडियासोबत ही बोलण्याची पद्धत नव्हती. मी त्याच्याविरोधात आवाज उठवला", असं तनुश्री म्हणाली. "नंतर याबाबत मी मीडियासोबत शेअर केले. दिग्दर्शकाचे नाव न घेता मी मुलाखतीत जे काही घडलं ते सांगितलं", असं तनुश्री म्हणाली.

2018-2020 या काळात तनुश्री #MEETOOमुळे चर्चेत आली होती. तिनं तिच्या कारकि‍र्दीत बऱ्याच हिट चित्रपटात प्रमुख साकारली होती. भागम भाग, 36 चायना टाऊन, ढोल, रिस्क, गुड बॉय बॅड बॉय या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
Prashant Damle on Dia Mirza: 'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
Shivani Naik on Irregular Periods: 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
Shahrukh Khan King: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सना गुडन्यूज; 'किंग'मधील पहिलं गाणं रिलीज, दीपिकाचा भगवा लूक चर्चेत
किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सना गुडन्यूज; 'किंग'मधील पहिलं गाणं रिलीज, दीपिकाचा भगवा लूक चर्चेत

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Embed widget