Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री  मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत मुनमुन  'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. ही टिप्पणी करणं आता मुनमुनला भोवलं आहे. या संदर्भात मुनमुनला अट करण्यात आली. त्यानंतर अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तिची सुटका झाली. 


मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणा येथील हंसी पोलीस ठाण्यात हजर झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिने पोलीस ठाण्यात हजेरी लावली. अनुसूचित जातीवर टिप्पणी केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मुनमून दत्ताने या प्रकरणातील तपास अधिकारी विनोद शंकर यांच्यासमोर ती हजर झाली. त्यानंतर तिला अटक करण्यात आल. त्यानंतर तिची  सुमारे 4 तास चौकशी देखील करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर मुनमुनला अंतरिम जामीन मिळाला. 


9 जामनेवारी रोजी मुनमुननं यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये देखील तिनं अनुसूचित जातीवर  टिप्पणी केली. त्यावेळी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, याआधी क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री युविका चौधरी यांच्यावर जातीवर केलेल्या टिप्पणीमुळे गुन्हा दाखल झाला होता. 






संबंधित बातम्या


Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण


Shark Tank India : बर्गर मॅगी अन् आयुर्वेदिक आईसक्रीम; शार्क टँकमध्ये मांडण्यात आलेल्या 'या' अतरंगी बिझनेस आयडिया माहितीयेत का?


Kapil Sharma, Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कपिल शर्मावर नाराज? सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha