Shark Tank India : सध्या छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊयात या शोमध्ये येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. शोमधील परिक्षक हे शोमध्ये येणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीची कल्पना परीक्षकांना आवडली तर ते त्या व्यक्तीच्या व्यावसायासाठी मदत करतात. असा हा कार्यक्रम आहे. सध्या हा कार्यक्रम अनेक लोक आवडीने पाहात आहेत. शार्क टँकमध्ये काही यूनिक आयडिया घेऊन लोक येतात त्यापैकी काही अतंरगी आयडिया पाहूयात ज्या पाहून शोमधील परीक्षक देखील खळखळून हसले. 


आयुर्वेदिक आईसक्रीम
काही दिवसांपूर्वी आयुर्वेदिक आईसक्रीम ही आयडिया परिक्षकांसमोर मांडण्यासाठी एक व्यक्ती शार्क टँकमध्ये आला. ही आयडिया जेवढी यूनिक आहे तेवढीच अतरंगी देखील आहे. हे आईस्क्रिम खाल्ल्यानं शरीरातील कॅलरीज कमी होतात. तसेच वजन देखील कमी होते, असं त्या व्यक्तीनं सांगितलं.  



बर्गर मॅगी  
अनेकांना मॅगी आणि बर्गर खायला आवडते. हे दोन पदार्थांची एकच डिश तयार करून राहुल दागा आणि अर्पित काबार हे शार्क टँकमध्ये आले. त्यांची 'हंग्री हेड' ही कंपनी आहे.



बॅग होल्डर 
शोमध्ये आलेल्या सिद्धार्थ गुप्ता यांनी 'SID07 डिझाइन' नावाची कंपनी सुरू केली आहे. त्यांनी या कंपनीचे 11 प्रोडक्ट परीक्षकांसमोर सादर केले त्यापैकी बॅग होल्डर हे एक प्रोडक्ट आहे. 



अश्नीर ग्रोव्हर,नमिता थापर, अमन गुप्ता, गजल, पीयूश बंसल हे या शोचे परीक्षण करतात. 


संबंधित बातम्या


Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण


Jhund : 'झुंड'ची रिलीज डेट ठरली; नागराज मंजुळेकडून पोस्ट शेअर


Kapil Sharma, Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कपिल शर्मावर नाराज? सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha