Rannvijay Singh On MTV Roadies : 18 वर्षे रोडीज (Rodies) होस्ट केल्यानंतर रणविजय सिंहने (Ranvijay Singha) आता हा लोकप्रिय कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. रणविजयनं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रोडीज शो सोडण्याचे कारण सांगितले आहे.  


रणविजयनं सांगितलं, 'शो सुरू झाल्यापासून मी रोडिज या शोचा भाग आहे. मी एकमेव असा व्यक्ती आहे ज्याने गेली 18 वर्ष या शोमध्ये काम केले. मी एम टिव्ही या चॅनलच्या केवळ रोडिजचं नाही तर 14 ते 15 शोमध्ये काम केले आहे. काही कमिटमेंट, कोविड निर्बंध, तारीख आणि दक्षिण आफ्रिकेत शूटिंग या सर्व गोष्टींमुळे मी या शोच्या या सिझनचा भाग होऊ शकत नाही. या सिझनचे शूटिंग साऊथ अफ्रिकेमध्ये होत आहे. ओमायक्रॉनची सुरूवात देखील तिथूनच झाली. त्यामुळे अशा वातावरणामध्ये शूटिंग करणं योग्य नाही. '


रणविजय पुढे म्हणाला, 'जेव्हा रोडिज हा शो सुरू झाला त्यावेळी लोकांना माहित देखील नव्हते की हा शो नेमका कसा आहे. रोडिज हा शो माझ्या बाळासारखा आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त प्रेम या शोवर कोण करू शकते? '






रणविजय सिंह अनेक वर्षांपासून 'रोडीज' आणि एमटीव्हीचा भाग होते. फक्त रोडीजच नव्हे तर 'स्प्लिट्सविला' सारखा कार्यक्रमदेखील रणविजयने होस्ट केला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी 'शार्क टँक इंडिया' हा कार्यक्रमदेखील रणविजयने होस्ट केला होता.


संबंधित बातम्या


Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीची लता दीदींना श्रद्धांजली, 'कॉपी- पेस्ट' केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप


Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha