IPL 2022 : यंदा आयपीएलमध्ये 8 च्या जागी 10 संघ खेळणार असून लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघानी आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. महालिलावापूर्वी या दोन्ही संघानी घेतलेल्या तीन-तीन खेळाडूंची यादी जाहीर केली. ज्यानंतर लखनौने संघाचं नाव देखील ठेवलं होतं. तर आता अहमदाबाद संघाने त्यांच्या संघाचं नाव ठेवलं आहे. अहमदाबाद संघाने कर्णधार म्हणून अष्टपैलू हार्दिक पांड्याला घेतलं असून फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल यांनाही करारबद्ध केलं आहे. 


आता अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. आता अहमदाबाद संघ अहमदाबाद टायटन्स (Ahmedabad Titans) या नावाने ओळखला जाणार आहे. दुसरीकडे लखनौ संघाने टीमचं नाव लखनौ सुपरजायंट्स असं नाव ठेवलं आहे. लखनौ संघाने कर्णधार म्हणून केएल राहुलला घेतलं असून जोडीला स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. 


हार्दिकसह राशिद आणि शुभमनही अहमदाबादमध्ये


आयपीएलमधील 8 संघानी त्यांचे खेळाडू रिटेन केल्यानंतर लिलावापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नव्या संघानाही तीन-तीन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली. ज्यानंतर लखनौ संघाने केएल राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हार्दिककडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. हार्दिक आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15-15  कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत.    


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha