Kapil Sharma, Akshay Kumar : 'द कपिल शर्मा शो'  (The Kapil Sharma Show) मुळे कपिल शर्माला  (Kapil Sharma) विशेष लोकप्रियता मिळाली. कपिलचा 'कपिल शर्मा: आय एम नॉट डन येट' (Kapil Sharma : I Am Not Done Yet) हा नेटफ्लिक्सवरील (Netflix) नवा शो  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गेले काही दिवस अशी चर्चा होत आहे की कपिलवर अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नाराज आहे. कारण त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शोमध्ये जोक केला. त्यामुळे अक्षय कपिल शर्मा शोमध्ये बच्चन पांडे या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही, असंही म्हटलं जात होतं. आता या सर्व गोष्टींवर कपिलनं स्पष्टीकरण दिलं आहेत. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 


कपिलची पोस्ट 
कपिलनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, मी अक्षय यांच्याबद्दलच्या बातम्या वाचत आहे. मी या विषयी इक्षय कुमार यांच्यासोबत चर्चा केली. आमच्यामध्ये झालेल्या मिस कम्यूनिकेशनमुळे या गोष्टी घडल्या पण आता सर्व ठिक आहे. आता सर्व ठिक आहे. आम्ही लवकरच बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भेटत आहोत. अक्षय हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे ते माझ्यावर कधीही नाराज होणार नाहीत. धन्यवाद' 






अक्षय 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा कपिल शर्मा शोमध्ये आला होता तेव्हा कपिल म्हणाला तुम्हाला आंबा खायला आवडतो का? असा प्रश्न प्रसिद्ध व्यक्तीला कोण विचारतं का?   2019 मध्ये अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी अक्षयनं अशा प्रकारचा प्रश्न पंतप्रधानांना विचारला होता. त्यामुळे अक्षय कपिलच्या या वाक्यामुळे नाराज झाला. 
 
 रिपोर्ट्सनुसार, अक्षयने शोच्या निर्मात्यांना नरेंद्र मोदी यांच्या विषयी कपिल जे बोलला ते  प्रसारित न करण्याची विनंती केली होती. निर्मात्यांनी हे मान्य केलं की कपिलच्या वाक्याची ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यानंतर अक्षयला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले.


संबंधित बातम्या


Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण


Jhund : 'झुंड'ची रिलीज डेट ठरली; नागराज मंजुळेकडून पोस्ट शेअर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha