Suraj Chavan :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता झालेला सूरज चव्हाण (Suraj Chavan) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यातच केदार शिंदे यांनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) असं या सिनेमाचं नावही त्यांनी सांगितलं होतं. नुकतच या सिनेमाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सूरज चव्हाणसोबत या सिनेमात मालिकेतील अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे.  कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमधील काही कलाकार या सिनेमात झळकणार आहे. 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मलिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, 'अबीर गुलाल' मालिकेतील पायल जाधव, 'तुमची मुलगी काय करते' मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे हे कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. 


सूरजच्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता


सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला असला तरीही सिनेमाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सिनेमाची कथा काय असणार याविषयी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजच्या आयुष्यातील हा एक मोठा टप्पा आहे. त्यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 


सूरज चव्हाण कोण आहे?


मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. 


बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.   






ही बातमी वाचा : 


Sandhya Theatre Stampede: चार तास पोलीस स्थानकात, तो व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुन भावुक; चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?