Christmas 2024 Wishes In Marathi : आज 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातो, या दिवशी अनेक जण एकमेकांना भेटून तसेच सोशल मीडियावर मेसेजद्वारे शुभेच्छा संदेश पाठवत असतात. ख्रिसमस सोबत आता नवीन वर्षाची देखील सुरुवात होत आहे. 2024 हे वर्ष संपून नवीन वर्ष (Happy New Year 2025) सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत.  नवीन वर्षानिमित्त (New Year 2025 Wishes In Marathi) तुम्ही हे शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवून नाताळ आणि नववर्षाचा आनंद वाढवू शकता.


नाताळ शुभेच्छा संदेश (Christmas Wishes In Marathi)


यंदाचा ख्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!


ख्रिसमसचा आनंद घ्या
आणि थंडीची मजा लुटा
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!


हा नाताळ आपणा सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट,
आपण सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!


या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे 
हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो...
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!


नाताळचा सण,
सुखाची उधळण
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
 
सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास 
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास 
नाताळच्या शुभेच्छा!


नववर्ष शुभेच्छा संदेश (News Year 2025 Wishes In Marathi)


तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


गेलं ते वर्ष, 
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा 
घेऊन आले 2025 साल !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षात
माझ्या मित्रांना
काय हवं ते मिळू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


चिअर्स टू न्यू ईयर 
आणि नव्या संधीसाठी 
जी तुम्हाला नेईल यशाच्या शिखरावर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


आयुष्यातील अजून एक वर्ष सरत आहे, 
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत
सुख, शांती, यश आणि प्रेम 
या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हे वर्ष सर्वांना सुखाचे-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


दाखवून गत वर्षाला पाठ 
चाले भविष्याची वाट 
करुन नव्या नवरीसारखा थाट 
आली ही सोनेरी पहाट!!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


आपली सर्व स्वप्न, आशा, 
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Astrology : यंदाचा नाताळ 3 राशींसाठी ठरणार खास; 25 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले