मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम चार ते पाच दिवसात 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिला आणि आधार सीडींग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी 67,92,292 महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
अदिती तटकरे नेमकं कायम म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. .डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करत असताना त्यामध्ये 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. आधार सीडींगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडींग झालं आहे अशा12 लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्या टप्प्यानं वितरीत करणार आहोत. पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे. अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहे. या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा, असं आवाहन अदिती तटकरे यांनी केलं.
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया कालपासून पुन्हा सुरू करून पहिल्या दिवशी 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नवीन नोंदणी बद्दल काय?
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणी बाबात भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांना 2100 अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली. अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रती फॉर्म मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित आहेत.
इतर बातम्या :