एक्स्प्लोर

Sunny Marathi Movie : दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Sunny Marathi Movie : अभिनेता ललित प्रभाकरच्या 'सनी' चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

Sunny Marathi Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' (Sunny) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तरूणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात अभिनेता ललिल प्रभाकर (Lalit Prabhakar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत. घरापासून दूर असल्यावर क्षणोक्षणी घरच्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. अशात जर जिवाभावाचे काही मित्र सापडले तर मनावरच ओझं थोडं हलकं होतं. वेगवेगळ्या गावातून एकत्र आलेल्या काही मित्रांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या गावातून एकत्र जमलेल्या मित्रांची धम्माल, मस्ती या गाण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. या गाण्यात आपल्याला ललित प्रभाकर सोबत क्षिती जोग, अभिषेक देशमुख हे कलाकार थिरकताना दिसत आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास प्रोत्साहित करणारं, ताजतवानं करणारं हे गाणं प्रत्येक बर्थडे पार्टीमध्ये, आनंद सोहळ्यात हे गाणं वाजणार हे नक्की. ललित प्रभाकरचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.  

या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या 'त्या' दिवसांची आठवण करून देणारं आहे.'' 

प्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. या गाण्याला सिद्धार्थ आणि सौमील यांनी संगीत दिले असून नृत्यदिग्दर्शनाची धुरा सुजीत कुमार यांनी सांभाळली आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे तर 'सनी'चे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

Boyz 4: काय म्हणता ‘बॉईज 4’ही येणार? 'बॉईज 3'च्या जबदरस्त यशानंतर निर्मात्यांची घोषणा!

महत्त्वाच्या बातम्या

Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget