Oscars 2022 :

  94 व्या आकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscar Awards 2022) विजेत्यांची घोषणा काल (28 मार्च) झाली. अनेक कलाकारांना हा पुरस्कार देऊ गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉस्ट्यूम डिझायनर आणि  सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगिरीमधील पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ड्यून, कोडा, किंग रिचर्ड क्रुएला, ड्राइव माय कार आणि अॅनकँटो या चित्रपटांना अनेक कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ऑस्कर विजेते हे चित्रपट अनेकांनी पाहिले नसतील. तुम्ही घरबसल्या हे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


ड्यून (Dune)
ड्यून चित्रपटानं 11 श्रेणींमध्ये 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. ‘ड्यून’ चित्रपटाचे कथानक हे लेखक क फ्रँक हर्बर्ट यांच्या एपिक सायन्स फिक्शन नॉवेलवर आधारित आहे. या चित्रपट तुम्ही घरबसल्या प्राइम व्हिडीओ, बहुक माय शो स्ट्रीम आणि YouTube मूव्हिज या प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


कोडा (CODA)
कोडा ही ऑस्कर 2022 मधील बेस्ट फिल्म ठरली. या चित्रपटाला पुरस्कार सोहळ्यात स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले, ‘CODA’ हा ‘Child of Deaf Adults’ चा शॉर्ट फॉर्म आहे. या चित्रपटामध्ये रूबी या भूमिकेचा संघर्ष मांडण्यात आला आहे.  Apple TV+ या प्लॅटफोर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 
 
किंग रिचार्ड (King Richard)
किंग रिचार्ड हा चित्रपट  रिचर्ड विलियम्स (Richard Williams)च्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला (Actor Will Smith) बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 
 
‘एन्कांटो’(Encanto)
‘एन्कांटो’ या चित्रपटाला बेस्ट एनिमिटेड फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


The Eyes Of Tammy Faye
The Eyes Of Tammy Faye या चित्रपटासाठी अभिनेत्री जेसिका चॅस्टेन (Jessica Chastain)ला ऑस्करचा सर्वेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
वेस्ट साइड स्टोरी चित्रपटासाठी अरियाना डीबोसला ऑस्करचा सर्वेत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


द पॉवर ऑफ द डॉग (The power of the dog)
दिग्दर्शक डायरेक्टर जेन कँपियन यांना  द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 
 
 The Queen of Basketball
या चित्रपटाला बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही  YouTube मूव्हिज या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha