Suhana Khan : नुकताच IPL 2022चा आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरच्या चाहत्यांसाठी हा सामना आणखीनच खास बनला होता, कारण या सामन्यात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिची मैत्रिण आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या.


अनन्या आणि सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी काही तासांपूर्वी आपापल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीही शेअर केल्या होत्या. सुहाना आणि अनन्या त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अतिशय स्पोर्टी मोडमध्ये दिसल्या होत्य आणि नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होत्या. त्याचवेळी वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर सुहाना आणि अनन्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. शाहरुखसोबतच अनन्या- सुहाना यांना पाहून केकेआरचे चाहते खूप खूश झाले होते.






‘इंस्टा क्वीन’ सुहाना खान


सुहाना खानबद्दल बोलायचे तर, सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असूनही तिची फॅन फॉलोइंग मजबूत आहे. सुहानाचे इंस्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. सुहानाचे बोल्ड फोटो आणि तिचा देसी अवतारही प्रेक्षकांना खूप आवडतो. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना हिला अभिनेत्री म्हणून पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे.


अनन्याचे आगामी प्रोजेक्ट्स


अभिनेत्री अनन्या पांडे आगामी ‘लायगर’ या चित्रपटात झळकणार आहे. 'Liger’ हा एक अतिशय रोमांचक चित्रपट आहे. ‘लायगर’मध्ये अॅक्शन, रोमान्स, ड्रामा, कॉमेडी, सस्पेन्स सारं काही पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री 'खो गये हम कहाँ' हा चित्रपट करत आहे, ज्यात तिच्यासोबत आदर्श गौरव आणि सिद्धांत देखील झळकणार आहेत. हा चित्रपट सोशल मीडिया आणि डिजिटल युगाची कथा सांगणारा आहे. याशिवाय आणखी एका चित्रपटाची मोठी घोषणा लवकरच होणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha