एक्स्प्लोर

Sufyan Nadiadwala Looks Like Salman Khan: 'सलमान खानचा लेक असता, तर सेमटू सेम...'; 'या' स्टारकीडला पाहून लोकांचे डोळे फिरले, आठवला तरुणपणीचा भाईजान VIDEO

Sufyan Nadiadwala Looks Like Salman Khan: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधला स्टारकीड आहे, सूफयान नाडियाडवाला, प्रसिद्ध सिनेनिर्माता साजिद नाडियाडवाला याचा लेक.

Sufyan Nadiadwala Looks Like Salman Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या लग्नाच्या चर्चा म्हणजे, चाहत्यांचा आवडता विषय. विषय कुणाच्याही लग्नाचा असो, चाहत्यांना आजही वयाची साठी गाठलेल्या सलमान खानच्या लग्नाची चिंता सतावते. तसं पाहिलं तर, आजही सलमान खान कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. पण, तुम्हाला माहितीय का? सध्या सोशल मीडियावर सलमान खानचीच (Actor Salman Khan) चर्चा रंगली आहे. यावेळी मात्र, त्याच्या लग्नाची नाहीतर जर त्याचं लग्न झालं असतं, तर त्याचा लेक कसा दिसला असता याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी कारण ठरतोय, एका स्टारकीडचा व्हायरल होणारा व्हिडीओ. या स्टारकीडला पाहून लोकांना आज जर सलमान खानचं लग्न झालं असतं आणि त्याचा लेक असता तर तो सेम टू सेम याच्यासारखाच दिसला असता, असं म्हणतायत. 

सध्या सोशल मीडियावर एका स्टारकीडनं धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे सारेच अवाक् झालेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधला स्टारकीड आहे, सूफयान नाडियाडवाला (Sufyan Nadiadwala), प्रसिद्ध सिनेनिर्माता साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) याचा लेक. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ज्याक्षणी सूफयान नाडियाडवाला (Sufyan Nadiadwala Viral Video) कॅमेऱ्यासमोर आला, त्या क्षणापासून लोकांना त्याच्यात नव्वदच्या दशकातला सलमान खान दिसला. त्याच्या व्हायरल व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी तर सलमान खानचा लेक असता तर तो सेम टू सेम असाच दिसला असता, असं म्हटलंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐁𝐇𝐀𝐑𝐀𝐓 (@bharatcore_)

सूफयान नाडियाडवालाचा लूक (Sufyan Nadiadwala Look)

सुफियान मुंबईतील एका 'स्क्रीनिंग'वेळी दिसून आला, जिथे त्यानं पॅपाराझींसाठी पोझही दिल्या. या इव्हेंट दरम्यानचा त्याचा लूक आणि वावर खरोखरंच पाहण्यासारखा होता. त्यानं जीन्सवर निळ्या रंगाचा 'फिटेड' टी-शर्ट परिधान केला होता आणि कानात बाली घालून आपला लूक पूर्ण केलेला. सूफयान नाडियाडवालाचा हा लूक अगदी नव्वदच्या काळातल्या सलमान खानच्या लूकशी मिळता-जुळता होता. सूफयान नाडियाडवालाच्या व्हिडीओवर युजर्सनी कमेंटचा वर्षाव केलाय.

सोशल मीडियावर युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस (Sufyan Nadiadwala Look Like Salman Khan)

व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस आला. अनेकांनी त्याला सलमान खानचं यंग वर्जन म्हटलं, तर कुणी त्याचे जेनेटिक्स सेम टू सेम सलमान खान सारखेच असल्याचं म्हटलंय. अनेकांनी त्याची तुलना त्याचे वडील साजिद नाडियाडवाला यांच्याशीसुद्धा केलीय. तर अनेकांनी हॉलिवूड स्टार्सशी मिळती-जुळती पर्सनॅलिटी असल्याचं म्हटलंय.

सूफयान नाडियाडवाला करतो काय? (Who Is Sufyan Nadiadwala?)

सूफयान, साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांचा लहान लेक आहे. त्यांचा मोठा भाऊ सुब्हान सुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे आणि त्याची फिल्म 'ऐसी दीवानगी' चर्चेत आहे. सध्या सुफियानचा सिनेसृष्टीत डेब्यू करण्याचा कोणताही प्लान नसला, तरी त्याच्या पर्सनॅलिटीनं ज्या प्रकारे लोकांचं लक्ष वेधून घेतलंय, ते पाहता जर त्यानं या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तर त्याला चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळू शकतो, यात शंकाच नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
Embed widget