एक्स्प्लोर

Subodh Bhave On Work Life And Money: 'पैशासाठी काही गोष्टी कराव्या लागतात...'; कामात पैशाचा समतोल ठेवण्याबाबत सुबोध भावे काय म्हणाला?

Subodh Bhave On Work Life And Money: प्रत्येक प्रोजेक्ट मनापासून नाही करता येत, काही गोष्टी पैशासाठीही कराव्या लागतात, वर्क लाईफ आणि पैशांबाबत स्पष्टच बोलला मराठी अभिनेता.

Subodh Bhave On Work Life And Money: मराठी मालिकाविश्वासोबतच (Marathi Serials), सिनेविश्वातही प्रसिद्ध असलेला बहुमुखी अभिनेता म्हणजे, सुबोध भावे (Subodh Bhave). आपल्या विविध मालिका, सिनेमे आणि त्यात साकारलेल्या वेगळ्या भूमिकांमुळे सुबोध भावे घराघरांत पोहोचलाय. सध्या झी मराठीवरच्या वीण दोघांतली ही तुटेना (Veen Doghatli Hi Tutena) या मालिकेत सुबोध मुख्य भूमिकेत दिसतोय. या मालिकेत त्याच्यासोबत तेजश्री प्रधानही मुख्य भूमिका साकारतेय. तसेच, सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'सकाळ तर होऊ द्या...'मुळे चर्चेत आहे. या सिनेमातली काही गाणी नुकतीच प्रदर्शित झालीत. याच निमित्तानं सुबोध भावेनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. 

मराठी अभिनेता सुबोध भावेनं नुकतीच 'व्हायफळ' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलेलं की, काम आणि पैसे यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं, तर ते गेल्या 25 वर्षांत कसं केलं? यावर बोलताना अभिनेता म्हणाला की, "ते खूप महत्त्वाचं आहे. आपण करतोय त्याला दोन्ही अर्थांनी किंमत असायला हवी... ती किंमत आपल्यालाही मिळायला पाहिजे आणि समोरच्याला देखील त्याचा मोबदला मिळायला पाहिजे... त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे..." 

"कधीच फुकटात काम करायचं नाही. पैसे कमी घेऊन काम करा. तुम्ही त्यांना सांगा की, तुमच्यासाठी मी कमी पैशात काम करत आहे. माझ्या सुदेवानं ही गोष्ट माझ्या लवकर लक्षात आली; पण पैशासाठी कधी काम सोडलं नाही. मी कामासाठीच काम करीत राहिलो. पैसा येत गेला. पैसा कमावला पाहिजेच. पण त्या पैशामुळे आनंद आला पाहिजे. त्यानं दुःख आलं नाही पाहिजे. त्या पैशानं झोप उडाली नाही पाहिजे. मला वाटतं की, ज्या क्षणी तुमची तुम्हाला गरज कळते. त्या क्षणी तुम्ही पैशाचा आनंद घ्यायला लागता. ज्यावेळी गरज आणि पैसा यामध्ये गल्लत निर्माण होते, त्यावेळी गोंधळ होतो.", असं सुबोध म्हणाला. 

काही गोष्टी पैशासाठी कराव्या लागतात : सुबोध भावे (Subodh Bhave On Money)

"मला असं वाटतं की विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते, त्या क्षणी आयुष्य सुंदर बनतं. जर गोंधळ असेल, तर काहीच आनंद मिळत नाही. कलाकार म्हणून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा काही वेळा काही गोष्टी पैशासाठी कराव्या लागतात आणि त्यात काहीच गैर नाही. काही वेळा मात्र समाधानासाठी काम केलं जातं, जरी त्यात मानधनाचं समाधान नसलं तरी. पण यापैकी एक तरी समाधान मिळणं गरजेचं आहे.", असं सुबोध भावे म्हणाला. 

पुढे बोलताना सुबोध भावे म्हणाला की, "जर या दोन्ही गोष्टी पैसा आणि समाधान मिळत नसतील, तर ते काम करू नका. एखाद्या भूमिकेसाठी पैसे चांगले मिळत असतील आणि त्यामुळे घर चालणार असेल, तर ते काम नक्की करा. पण जर पैसा नसेल, तरी भूमिकेत मजा आणि आत्मिक समाधान मिळत असेल, तर त्या कामात उडी घ्या. कारण असं काम पुढचं अनंत काम करण्याची ऊर्जा देतं. त्यामुळे कलाकाराने स्वतःमध्ये ही स्पष्टता ठेवणं फार महत्त्वाचं आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Atharva Sudame Vaishali - Roopali: पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
Shivsena Uddhav Thackeray VIDEO: 'ही दोस्ती तुटायची नाय'च्या गाण्यावर उद्धव ठाकरेंनी धरला ठेका; आदित्य ठाकरेंचीही हजेरी, नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती, VIDEO
'ही दोस्ती तुटायची नाय'च्या गाण्यावर उद्धव ठाकरेंनी धरला ठेका; आदित्य ठाकरेंचीही हजेरी, नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती, VIDEO
Aditya Kripalani: बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
Embed widget