तेजस देऊस्करांच्या 'देवमाणूस'साठी सुबोध भावे ऑनबोर्ड; महेश मांजरेकर, रेणुका शहाणेंसोबत करणार स्क्रिन शेअर
Subodh Bhave Upcoming Movie: बालगंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटांतील अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सुबोध भावे, ज्याची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे.
Subodh Bhave Upcoming Movie Devmanus : तेजस देऊस्कर (Tejas Deoskar) दिग्दर्शित 'देवमाणूस' (Devmanus) या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या दिग्गज कलाकारांच्या टीममध्ये आता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) देखील सामील झाला आहे. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट (Multistarrer Movie) असणार आहे, यात शंका नाही. आकर्षक आणि उच्च दर्जाचं नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि अनुभवायला मिळेल.
बालगंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटांतील अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सुबोध भावे, ज्याची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. जो नेहमी आपल्या प्रत्येक भूमिकांसाठी स्वतःला झोकून देतो. कॉम्प्लेक्स, स्टेबल यांसारख्या विविध लेवलची पात्रं साकारण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्याचं अनेकदा कौतुक झालं आहे. त्याचा हा समावेश आणि योगदान नक्कीच चित्रपटाच्या कथेला एक नवं आयाम देईल.
देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे यानं बोलताना सांगितलं की, "मला यापूर्वी दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, पण देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणं, हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हेसुद्धा पाहण्यासाठी मी आतूर आहे."
दरम्यान, देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.
'देवमाणूस'मधून महेश मांजरेकर, रेणुका शहाणेंची जोडी भेटीला
बहुचर्चित तेजस देऊस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'देवमाणूस' सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत जे प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असणार आहे. दोन्ही कलाकारांचे जबरदस्त अभिनय कौशल्य प्रदर्शित करण्याचे वचन हा आगामी मराठी चित्रपट देणार आहे. या अभिनेत्यांचे चाहते एका अविस्मरणीय अनुभवाची वाट पाहू शकतात, जिथे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे मुख्य आकर्षण असेल त्यामुळे नक्कीच हा चित्रपट एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :