Munawar Faruqui) : कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) ‘लॉक अप’चा (Lock Upp) विजेता बनण्यात यशस्वी झाला आहे. मुनव्वर फारुकी हा सुरुवातीपासूनच या खेळाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात होते. अनेकांनी मुनव्वरला सुरुवातीपासूनच शोचा विजेता मानलं होतं. मुनव्वरने सर्वांच्या प्रेक्षक आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि शेवटी या शोची ट्रॉफी जिंकली.  मुनव्वरचा स्टँड-अप कॉमेडियन होण्यापासून लॉक अपचा विजेता बनण्यापर्यंतचा प्रवास बराच संघर्षमय होता.


लॉक अपमध्ये प्रवेश घेताच मुनव्वर याने आपली खरी बाजू खरी लोकांना दाखवली होती. इतकंच नाही तर, संधी मिळताच त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही धक्कादायक खुलासा केलाले. यामुळेच शोची ट्रॉफी जिंकण्यासोबतच मुनव्वरने लाखो लोकांची मनेही जिंकली आहेत. 



रोख रक्कम आणि बरंच काही...


ट्रॉफी व्यतिरिक्त, मुनव्वरला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे. काही काळ मुनव्वर अनेक संकटांना सामोरे गेला. मात्र आता मुनव्वरचे चांगले दिवस सुरू झाल्याचे दिसत आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वरच्या चेहऱ्यावरचे हास्य या मागचा प्रवास सांगत होते. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वरने शो आणि त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले. 


‘धाकड’चे प्रमोशन


प्रिन्स नरुला, मुनव्वर फारुकी, पायल रोहतगी, अंजली अरोरा, शिवम शर्मा, आजमा फल्लाह यांनी शोच्या अंतिम फेरीत ‘टॉप 6’मध्ये स्थान मिळवले होते. मात्र, बाकी सर्व स्पर्धकांना मागे टाकत मुनव्वरने ही ट्रॉफी जिंकली. शोच्या फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांनी जोरदार कामगिरी दाखवली होती. ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले. या शोमध्ये कंगनाच्या 'धाकड' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. या चित्रपटातील तिची सहकलाकार दिव्या दत्ता आणि चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश घईही शोमध्ये पोहोचले. यावेळी कंगनाने धाकडमधील 'शी इज ऑन फायर' या गाण्यावर डान्सही केला.


हेही वाचा :


Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकणार लग्नबंधनात, लंडनमध्ये घेणार सात फेरे


Ravi Jadhav : 'नटरंग' ते 'टाइमपास 3'... कसा होता दिग्दर्शक रवी जाधव यांचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास? पोस्ट चर्चेत


Mothers Day Special : आई-मुलांच्या नात्यावर भाष्य करणारे 'हे' बॉलिवूड सिनेमे मातृदिनी नक्की पाहा