Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. सोनालीने 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत (Kunal benodekar) दुबईतील एका मंदिरात लग्न केलं. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली पुन्हा एकदा कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
सोनालीने खूपच घाई गडबडीत कुणालसोबत दुबईतील एका मंदिरात लग्न केले होते. त्यामुळे सोनाली आता कुटुंबियांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा लंडनमध्ये सात फेरे घेणार आहे. विशेष म्हणजे सोनाली आणि कुणालच्या लग्नाला दोघांचेही आई- बाबा उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ते आई-बाबांच्या उपस्थित पुन्हा एकदा लग्न करणार आहेत.
जुलै महिन्यात साग्रसंगीत पद्धतीने सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध होणार होते. मात्र वाढत्या कोरोनाप्रादुर्भावामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. सध्या सोनालीचे मेहंदी, संगीत, हळद असे सर्व कार्यक्रम होत आहेत.
संबंधित बातम्या