Mothers Day Special : सध्या अनेक बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होत आहे. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करू शकणार नाही. त्यामुळे तिचे आभार मानण्यासाठी मातृदिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूडमध्येदेखील आई-मुलांच्या नात्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे आहेत. बॉलिवूडचे हे सिनेमे मातृदिनी नक्की पाहा. 


मॉम (2017) :
मॉम सिनेमात श्रीदेवी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात एका सशक्त आईची कथा मांडण्यात आली आहे. आर्या नावाच्या मुलीची कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. शाळेतील काही मुले आर्यावर सामूहिक बलात्कार करतात. त्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलते, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. श्रीदेवीने या सिनेमात सावत्र आईची भूमिका साकारली आहे. 


मदर इंडिया (1957) :
महबूब खान दिग्दर्शित 'मदर इंडिया' हा सिनेमा प्रचंड गाजला होता. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या सिनेमात आईने मुलांसाठी केलाला त्याग दाखवण्यात आला आहे. 1957 साली प्रदर्शित झालेला 'मदर इंडिया' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 


जज्बा (2015) : 
'जज्बा' या सिनेमाच्या माध्यमातून ऐश्वर्या रायने कमबॅक केले होते. या सिनेमात ऐश्वर्या राय एका आईच्या भूमिकेत होती. हा सिनेमा नोकरी करणाऱ्या आईवर भाष्य करणारा आहे. घर आणि ऑफिस एक आई कशी सांभाळते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. 


मातृ (2017) :
'मातृ' सिनेमादेखील एका आईवर भाष्य करणारा आहे. मुलीवर बलात्कार होतो नंतर तिचा मृत्यू होतो तरीही ती आई व्यवस्थेशी लढते, गुन्हेगारांना पकडते. या सिनेमात रवीना टंडनने एका सशक्त आईची भूमिका साकारली आहे. 


निल बटे सन्नाटा (2015) : 
'निल बटे सन्नाटा' या सिनेमात स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत आहे. हा विनोदी सिनेमा असला तरी या सिनेमात सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमात स्वरा घरकाम करून मुलीचा सांभाळ कसा करते हे दाखवण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या


Mohan Juneja Passes Away : ‘केजीएफ 2’ फेम अभिनेते मोहन जुनेजांचे निधन, बंगळूरूमध्ये घेतला अखेरचा श्वास


Salman Ali : इंडियन आयडॉल फेम सलमान अलीचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'मजनू' मध्ये करणार पार्श्वगायन


Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'मॉं कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित