Pranit More In Bigg Boss 19 Show: 'महाराष्ट्रीय भाऊ' स्टेजवर आला अन् सलमान खानही घडाघडा मराठी बोलला; VIDEO पाहिलात?
Pranit More In Bigg Boss 19 Show: प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन 'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणित मोरेनं 'बिग बॉस 19'च्या घरात दणक्यात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरातला अकरावा सदस्य म्हणून प्रणित मोरेनं प्रवेश केला.

Pranit More In Bigg Boss 19 Show: प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन 'महाराष्ट्रीयन भाऊ' (Maharashtriyan Bhau) प्रणित मोरेनं (Pranit More) 'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात दणक्यात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरातला अकरावा सदस्य म्हणून प्रणित मोरेनं प्रवेश केला. लाडक्या 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला 'बिग बॉस 19'च्या मंचावर पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. प्रणित मोरे अगदी शांतपणे चालत 'बिग बॉस 19'च्या मंचावर आला. पण, त्यापूर्वीच त्यानं सलमान खानला धडकी भरवली होती. कारण, मराठमोळाप्रणित स्टेजवर येताच सलमान खान (Salman Khan) घडाघडा मराठीत (Marathi Language) बोलू लागला. त्यानंतर दोघांमधील संभाषणानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
महाराष्ट्राच्या (Maharashtra News) प्रणितला बिग बॉसमध्ये पाहून त्याचे चाहते सोशल मीडियावरही त्याला खूप पाठिंबा देत आहेत. प्रणितनं फरहाना भट्टसोबत घरात प्रवेश केला. प्रणित मोरे ज्यावेळी 'बिग बॉस 19'च्या स्टेजवर आला, तेव्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रणित मोरेनं बॉलिवूडच्या भाईजानलाही धडकी भरवली की, भाईजान चक्क मराठीत बोलला. बिग बॉसच्या मंचावर येताच प्रणितनं सलमानलाही मराठीत बोलण्यास भाग पाडलं. बिग बॉसच्या मंचावर प्रणितनं त्याच्या स्टँडअप कॉमेडीनं सगळ्यांचीच मनं जिंकली.
View this post on Instagram
प्रणित स्टेजवर आल्यानंतर काय घडलं?
प्रणित मोरे अगदी शांतपणे चालत 'बिग बॉस 19'च्या स्टेजवर आला. समोर भाईजान सलमान खान उभा होता. सलमानजवळ पोहोचल्यावर प्रणित सलमान खानला 'हॅलो सर' म्हणाला. तेवढ्यात सलमान खान मराठीत म्हणाला की, "मला वाटलं होतं की, माझ्यावरती काहीतरी येणार..." त्यावर बोलताना प्रणितनं रिप्लाय दिला की, "नाही... नाही सर... आपपर मजाक उडाउंगा तो, मैं उड जाऊंगा..."
दरम्यान, मराठमोळा प्रणित मोरे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला. आपल्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता वीर पहाडियाची खिल्ली उडवल्यामुळे प्रणितला 10-12 लोकांच्या एका गटानं मारहाण केली होती. त्यानंतर प्रणितनं सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच लावून धरलेलं. परिणामी वीर पहाडियानं प्रणित मोरेची जाहीर माफी मागितलेली.
प्रणित मोरे कोण?
मराठमोळा प्रणित मोरे हा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. प्रणितनं त्याच्या क्लासी कॉमेडी टायमिंगनं अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच, अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यंत त्यानं अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्याचं युट्यूबवरही स्टँड अप कॉमेडीचं चॅनल आहे. इंस्टाग्रामपासून युट्यूबपर्यंत, प्रणितच्या व्हिडीओंना लोकांकडून खूप प्रेम मिळतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























