एक्स्प्लोर

Sshura and Arbaaz Khan Age Difference: 'म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल...'; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

Sshura and Arbaaz Khan Age Difference: अरबाज खान यानं शूरा खानशी लग्न केलं असून, त्याच्यात वयाचं मोठं अंतर आहे. या अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अरबाजनं 2023 मध्ये शूराशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीही आहे.

Sshura and Arbaaz Khan Age Difference: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता अरबाज खान (Bollywood Actor Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान (Sshura Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणजे, मलायका अरोराचा (Malaika Arora) एक्स-हसबंड. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजनं शूरासोबतच दुसरं लग्न उरकलं. काही दिवसांपूर्वीच दोघांना एक गोंडस मुलगीसु्द्धा झालीय. आपल्या साऱ्यांनाच ठाऊक आहे की, दोघांच्या वयात खूप मोठं अंतर आहे. यावरुन दोघांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. आता पुन्हा एकदा अरबाज खानची पत्नी शूरा खान चर्चेत आली आहे. यावेळीही अरबाज आणि तिच्या वयात असलेलं मोठं अंतर हेच कारण ठरलंय. सोशल मीडियावर या विषयावर अनेकदा चर्चा होतच असतात, अशातच आता शूरानं ट्रोलर्सना दिलेल्या एका उत्तराची जोरदार चर्चा रंगली आहे.  

अरबाज खान यानं शूरा खानशी लग्न केलं असून, त्याच्यात वयाचं मोठं अंतर आहे. या अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अरबाजनं 2023 मध्ये शूराशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीही आहे. अरबाज हा त्याच्या पत्नीपेक्षा साधारणपणे 23 वर्षांनी मोठा आहे. वयातील या अंतरामुळे दोघांनाही अनेकदा ट्रोल केलं जातं. अरबाजनं यापूर्वीही यावर भाष्य केलं आहे आणि अलीकडेच शूरानंही ट्रोलर्सना उत्तर दिलंय.  


Sshura and Arbaaz Khan Age Difference: 'म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल...'; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

शूरा खान काय म्हणाली? (Sshura Khan On Arbaaz Khan)

शूरा खाननं काही दिवसांपूर्वी एक ऑनलाईन चॅठ सेशन ठेवलेलं, जिथे चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची तिनं उत्तरं दिली. शूराच्या या 'सवाल पूछो' सेशनवेळी एका युजरनं विचारलं की, 'एका म्हाताऱ्यासोबत तू खूश आहेस?' या प्रश्नावर शूरानं कोणतेही आढेवेढे न घेता उत्तर दिलं. ती म्हणाली की, "खरंच का? ते म्हातारे नाहीत, ते एक लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडल आहेत..."

अरबाज आणि शूराच्या मुलीचं नाव कुणी ठेवलं? (Sshura, Arbaaz Khan Daughter Name)

शुरानं इतरही अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं दिलीत. तिच्या मुलीचं नाव कोणी ठेवलं, असं विचारल्यावर शूरानं सांगितलं की, "सलीम अंकल - म्हणजेच, अरबाज खान यांचे वडील - यांनी तिचं नाव ठेवलंय..." दरम्यान, अरबाज आणि शूरा यांच्या मुलीचे नाव 'सिपारा अरबाज खान' असं आहे. 

Sshura and Arbaaz Khan Age Difference: 'म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल...'; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

अरबाजसोबतच्या पहिल्या 'डेट'बाबतही खुलासा

एका चाहत्यानं शुराला विचारले की, "तू अरबाजसोबत पहिल्या 'डेट'वर जाण्याचं का मान्य केलेलंस?" त्यावर शुरानं उत्तर दिलं की, "मी त्याच्यासोबत लावलेली एक पैज हरले होते, त्यामुळे मला त्याला डिनरसाठी घेऊन जावं लागलं..." दुसऱ्या एका युजरनं तिच्या सध्याच्या व्यवसायाबद्दल विचारलं, तेव्हा शूरानं सांगितलं की, "गृहिणी. पूर्णवेळ आई आणि पत्नी..." 

दरम्यान, मातृत्वाबाबत विचारलं असता, शुरानं त्याचे वर्णन "एक जादुई प्रवास..." असं केलंय. जिथे ती एकाच वेळी थकते आणि मजाही करते, तसेच जिथे तिला दर 12 सेकंदांनी हाक मारली जाते. एका युजरनं टिप्पणी केली की, "तुझं वजन थोडं वाढलं आहे..." त्यावर शुरा हसली आणि तिनं लिहिलंय की, "थोडंसं? माझं वजन 20 किलोनं वाढलंय..."

शूरा खान कोण? (Who Is Sshura Khan)

अरबाज खानचं पहिलं लग्न 1994 मध्ये अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरा हिच्याशी झालेलं, दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. मात्र, 2017 मध्ये या जोडप्यानं घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात शूरा आली आणि 2023 मध्ये दोघांनी लग्न केलं. शुरा खान ही एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असून तिनं प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगा राशा थडानी यांच्यासोबत काम केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Wife Sunita Ahuja Property: ना सुपरस्टार पती, ना मुलं... मग गोविंदाची पत्नी कुणाच्या नावावर करणार कोट्यवधींची संपत्ती? सुनीता अहुजाच्या उत्तरानं सारेच हैराण

ABP Majha च्या बातम्या LIVE: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget