Govinda Wife Sunita Ahuja Property: ना सुपरस्टार पती, ना मुलं... मग गोविंदाची पत्नी कुणाच्या नावावर करणार कोट्यवधींची संपत्ती? सुनीता अहुजाच्या उत्तरानं सारेच हैराण
Govinda Wife Sunita Ahuja Property: बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांची पत्नी सुनीता अहुजा नेहमीच आपल्या बेधडक आणि गंमतीशीर वक्तव्यांसाठी ओळखली जाते.

Govinda Wife Sunita Ahuja Property: कधीकाळी आपल्या सुपरहिट सिनेमांनी (Superhit Movie) बॉलिवूडला (Bollywood News) सावरणारा सुपरस्टार अभिनेता म्हणजे, गोविंदा (Actor Govinda). गेल्या काही दिवसांपासून गोविंदा वैयक्तिक आणि प्रोफेशनल कारणांमुळे चर्चेत आला आहे. कधी मराठी अभिनेत्रीसोबतचं (Marathi Actress) अफेअर, तर कधी इव्हेंटसाठी टॅक्सीनं केलेला प्रवासामुळे गोविंदा चर्चेत आलेला. त्यासोबत पत्नी सुनीता अहुजाच्या (Sunita Ahuja) सततच्या बिनधास्त वक्तव्यांमुळेही गोविंदाच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात.
बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांची पत्नी सुनीता अहुजा नेहमीच आपल्या बेधडक आणि गंमतीशीर वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झालेली, पॅपाराझींसमोरच तिनं एक कमेंट केली, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिनं एक फनी कमेंट केली आणि त्या कमें
बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांची पत्नी सुनीता आहूजा नेहमीच आपल्या रोखठोक आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने मुंबई विमानतळावर एका फनी कमेंटने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. विमानतळावर सुनीता तिच्या लाडक्या 'चिहुआहुआ' (Chihuahua) ब्रीडच्या पेट डॉगसोबत स्पॉट झाली होती. तिनं आपल्या लाडक्या डॉगला कडेवर घेतलेलं आणि नंतर कारच्या पुढच्या सीटवर अगदी आरामात बसवलं. याच व्हिडीओत सुनीतानं बोलता बोलते थेट आपल्या प्रॉपर्टीवर बोलायला सुरुवात केलीय. तसेच, आपली प्रॉपर्टी आपली मुलं किंवा पतीला न देता, भलत्याच व्यक्तीच्या नावावर करणार असल्याचं जाहीरच करून टाकलं.
सुनीता अहुजाच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या (Sunita Ahuja On Property)
सुनीता अहुजानं तिच्या लाडक्या श्वानाची आणि पॅपाराझींची ओळख करुन दिली. तिनं त्याला केकही भरवला आणि हा मला कधीच सोडून जात नाही, नेहमी माझ्यासोबतच असतो, असं म्हणाली. त्यानंतर तिनं त्या श्वानाला गाडीच्या फ्रंट सीटवर बसवलं. त्यानंतर पॅपाराझींशी गप्पा मारताना तिनं सांगितलं की, "मी माझी सगळी प्रॉपर्टी याच्याच (श्वानाच्या) नावावर करून देणार आहे..." तिचं हे बोलणं ऐकून तिथे उभ्या असलेल्या एका फोटोग्राफरनं लगेच विचारलं, "मॅडम, मग तुमचा भाचा कृष्णा अभिषेकचं काय?" फोटोग्राफरच्या या प्रश्नावर सुनीतानं अत्यंत प्रेमानं उत्तर दिलं की, "कृष्णाकडे आधीच खूप काही आहे आणि भविष्यात तो आणखी मोठी प्रगती करेल. तो माझा मुलगाच आहे. त्याच्याकडे भरपूर काही आहे, आता उलट मलाच त्याच्याकडून काहीतरी घ्यावं लागेल! कृष्णा आज माझ्यापेक्षा खूप मोठा माणूस बनलाय... देवानं त्याला अजून मोठं करावं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तो असाच यशस्वी आणि मोठा होत राहील..."
सुनिता आणि त्यांच्या पुतण्यातला दुरावा संपला
गोविंदा आणि गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्या नात्यात काही वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडलेला. पण, काही दिवसांपूर्वीच दोघांमधला वाद संपल्याचं दिसलं. 'लाफ्टर शेफ्स' (Laughter Chefs) या कुकिंग शोमध्ये सहभागी झालेल्या सुनिता यांनी जुने सर्व मतभेद बाजूला सारून कृष्णा आणि कश्मीरा यांना प्रेमानं मिठी मारली, त्यावेळी कृष्णा आणि कश्मिरा दोघेही भावूक झालेले. 14 वर्षांनंतर त्यांच्यातील हा वाद संपलेला पाहून चाहतेही भारावून गेलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Before You Go
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव






















