एक्स्प्लोर

Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 

सोशल मीडियावर व्हिडिओ करत तिने मोर्चे बॉम्बस्फोट, दंगली, मतं,अजेंडा, धर्म या सगळ्यांवर नेमक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Spruha Joshi: जंतर-मंतरवरील आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतलं. नीट पेपरफुटी विरोधाचा रोष लाठीचार्ज, अश्रुद्र्याच्या नळकांड्या वापरून दाबला गेला. गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेले शिक्षणतज्ञ व सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना जबरदस्ती उचलून रुग्णालयात पाठवण्यात आलं. आता कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP Protest) आंदोलकांना आणि जंतर-मंतरवर उपस्थित विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडून काढलं. हे सगळं घडत असताना अनेक कलाकारांनी, मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने केलेली कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ करत तिने मोर्चे बॉम्बस्फोट, दंगली, मतं,अजेंडा, धर्म या सगळ्यांवर नेमक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाली स्पृहा जोशी ?

'आमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंय
संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय
आमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंय..

रोजच उठून चालू आहे निष्पापांचे आक्रंदन
घुसमटणाऱ्या श्वासाचं रोजचेच आहे मूक रुदन
बोलू पाहणाऱ्या आवजाला आम्ही कधीच गप्प केलंय
संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय..

किती बॉम्बस्फोट, किती दंगली, माणसं मरतायत, मरू देत..
आपण त्यात नव्हतो ना,चला आजची रात्र टळू देत
उपोषण होतात, मोर्चे निघतात, झुरळं चक्क रस्त्यावर उतरतात
मत, विरोध, अजेंडा, धर्म, चर्चा बिर्चा नकोच काही

मुद्दा-प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही
निर्लज्जपणे आम्ही स्वत:लाच ठासून सांगितलंय
अन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय..

मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहील?
सांगताय कुणाला, लोंबकळा ट्रेनला, आजची भाकरी कोण देईल?
तसा फरक पडत नाही, जगाचं जगणं थांबतं नाही
आमच्या संथ आयुष्यावर एक ओरखडाही उमटत नाही..
अगतिकतेच तत्वज्ञान आम्ही स्पिरिट म्हणून बोकाळलंय,
अन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय

एकच वाटतं अशावेळी तरी धावून यावेत सारे हात
रक्त देताना तरी विचारू नये काय तुझी धर्म जात..
रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपलंय
नाहीतर संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget