Ravindar Chandrasekaran Wedding: दाक्षिणात्य चित्रपट निर्माते रविंद्र चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) यांनी प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीसोबत (Mahalaxmi) लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. अभिनेत्री महालक्ष्मीचे या आधीही एक लग्न झाले होते. तिला एक मुलगा देखील आहे. मात्र, तिचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. आता महालक्ष्मीने रविंद्र यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
रविंद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांचा विवाह एका खाजगी सोहळ्यात पार पडला. यादरम्यान काही निवडक लोकच त्यांच्या लग्नात सहभागी झाले होते. रविंद्र आणि महालक्ष्मी यांचा विवाह पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीने पार पडला. अभिनेत्री महालक्ष्मीने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
‘अशी’ झाली पहिली भेट!
रविंद्र आणि महालक्ष्मी यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. रविंद्र चंद्रशेखरन निर्मित 'विडियम वरई काथिरू' या आगामी चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली. या सेटवरच त्यांची मैत्री झाली आणि दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी भाग्यवान आहे.. तू माझे आयुष्य तुझ्या प्रेमाने आणि आपुलकीने परिपूर्ण केले आहेस..’
पाहा पोस्ट :
रविंद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांच्या लग्नाच्या या सुंदर फोटोंवर मित्र, चाहते आणि नातेवाईक यांच्याकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यासोबतच त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयुष्याच्या या नव्या सुरुवातीसाठी चाहते महालक्ष्मी आणि रविंद्र यांना खूप शुभेच्छा देत आहेत. अनेक चाहते या दोघांच्या जोडीचे खूप कौतुक करत आहेत. रविंद्र चंद्रशेखरन हे दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. रविंद्र 2013पासून दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तर, महालक्ष्मी एक प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री आणि व्हिडीओ जॉकी आहे. महालक्ष्मीने 'वाणी राणी', 'चेल्लामय', 'ऑफिस', 'अरसी', 'थिरु मंगलम', 'यामिरुक्का बायमेन' आणि ‘केलाडी कानमनी’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :