Entertainment News Live Updates 2 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Sep 2022 10:41 PM
Karthikeya 2 : 'कार्तिकेय 2'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट

Karthikeya 2 Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा (Nikhil Siddhartha) 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यानंतरदेखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. 'कार्तिकेय 2' हा या वर्षातला सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा ठरला आहे. 





लॉरेंस बिश्नोई गॅंगची सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी

Sidhu Moose Wala : दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) वडीलांना पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई या गॅंगने ई-मेलद्वारे धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मेल करत शांत राहण्याची धमकी दिली आहे. नाहीतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

Jakkal : पुण्यात घडलेल्या भीषण हत्याकांडावर आधारित मराठी वेब-सिरीज 'जक्कल'

Jakkal : जिओ स्टुडिओज लवकरच 'जक्कल' (Jakkal) नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. 1970 च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. 





National Cinema Day : 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत

National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16 सप्टेंबर हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' (National Cinema Day) म्हणून साजरा केला होता. यंदा यादिवशी देशभरात विविध ठिकाणी 4000 स्क्रीन्सवर 75 रुपयांत सिनेमा दाखवण्यात येणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) यासंदर्भात घोषणा केली आहे.





Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते'चा ट्रेलर रिलीज

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


Bhaubali : 'भाऊबळी'चं नवं पोस्टर आऊट

Bhaubali : 'भाऊबळी' (Bhaubali) या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र 'भाऊबळी' सिनेमाची चर्चा रंगली आहे. नुकतेच या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये मनोज जोशी आणि किशोर कदम दिसून येत आहेत. 





Bigg Boss 16 : भाईजानच्या बिग बॉसचं नवं पर्व लवकरच होणार सुरू

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अशी बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमाचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतं. त्यामुळेच प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत असतात. लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘तो माझ्यासाठी सगळं काही होता...’, सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर! पाहा व्हिडीओ...

‘द कपिल शर्मा शो’मध्ये होणार सासू-सासऱ्यांची एन्ट्री! नवा प्रोमो पाहिलात का?

Raju Srivastava health Update : प्रकृतीत थोडी सुधारणा, पण अजूनही ते व्हेंटिलेटरवर; जाणून घ्या राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरनसोबत बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

दाक्षिणात्य चित्रपट निर्माते रविंद्र चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) यांनी प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीसोबत (Mahalaxmi) लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.


 





Mega BlockBuster : मेगा ब्लॉकबस्टरमधील रोहित शर्माचा फर्स्ट लूक रिलीज

रोहित शर्मानं त्याचा मेगा ब्लॉकबस्टरमधील लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी खूप एक्सायटेड आहे.' रोहितच्या या पोस्टला क्रिकेटर सूर्यकुमार यादवनं कमेंट करुन लिहिलं, 'ये किस लाईन मै आ गये आप?' रोहितच्या आनेक चाहत्यांना त्याच्या पोस्टला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 





'सीता रामम' चा हिंदी ट्रेलर रिलीज

चिमुकल्या ‘परी’चं आई-बाबांसोबत ट्विनिंग, तुम्ही पाहिलात का मायराचा क्युट अंदाज?

Brahmastra : 'वानर अस्त्राची शक्ती...' ; करणनं शेअर केला ब्रह्मास्त्र चित्रपटातील खास व्हिडीओ

इंजिनिअरिंग केली, क्रिकेटही खेळला, आता मनोरंजन विश्व गाजवतोय अभिनेता किच्चा सुदीप!

चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) हा दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट स्टार्सपैकी एक आहे. आज (2 सप्टेंबर) अभिनेता किच्चा सुदीप याचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 2 सप्टेंबर 1973 रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. किच्चा सुदीपने आपल्या दमदार अभिनयाने कन्नड मनोरंजन विश्व गाजवले आहे. केवळ साऊथच नव्हे, तर तो अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे.


 





नात्याला नवी संधी देणार म्हणत पुन्हा एकत्र आले राजीव सेन-चारू असोपा!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण, आता असे दिसतेय की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच, दोघांमधील वाद देखील मिटले आहेत. चारू आणि राजीव यांनी पॅचअप केले आहे.





निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा

‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Tin Char)  या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.     


 





राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100 डिग्री ताप आल्याने राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्क्यांपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत. चाहते, कुटुंबीय आणि त्यांचे मित्र त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. जॉनी लिव्हर, सुनील पाल आणि अनेक विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी रुग्णालयात देखील गेले होते.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले


प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, त्यांच्या स्थितीत चढ-उतार कायम आहेत. नुकतेच त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा ताप आल्याने राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे.   


निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा


मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज (Jio Studio) आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Tin Char)  या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.    


‘घे डबल’चा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला


येत्या 30 सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे, कारण निमित्त आहेम अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam)  आणि भूषण पाटील  (Bhushan Patil)  यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.


‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका मायरा वायकुळने (Mayra Vaikul) साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.


जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र (Brahmāstra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अभिनेता नागार्जुन (Nagarjuna), अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला गाण्यांना आणि टीझरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर यानं हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.