Pawan Kalyan : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार पवन कल्याण (Pawan Kalyan) हे त्यांच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आज त्यांचा 51 वा वाढदिवस आहे. पवन कल्याण हे साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचे छोटे भाऊ आहेत. पवण कल्याण हे कलाकार, निर्माता-दिग्दर्शक, स्टंट को-ऑर्डिनेटर, गायक, नृत्यदिग्दर्शक आणि राजकारणी आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...


चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


पवन कल्याण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील बापटला येथे झाला. त्यांचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू असं आहे. पवन कल्याण यांनी 1996 मध्ये 'अक्कड अम्माई इक्कड अब्बाई' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. पवन कल्याण यांना 1998 साली 'थोली प्रेमा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 'भीमला नायक', खुशी, जलसा या पवन कल्याण यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पवन कल्याण यांच्या स्टाईलला आणि अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. 


वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत


पवन कल्याण हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा संसार थाटला आहे.  त्यांनी पहिले लग्न 1997 मध्ये नंदिनी यांच्यासोबत केले. पण फार काळ त्यांचा संसार टिकला नाही.  2008 मध्ये  पवन आणि नंदिनी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतप पवन कल्याण यांनी 2009 मध्ये रेणू देसाई यांच्यासोबत लग्न केले. रेणू आणि पवन यांचा 2012 मध्ये घटस्फोट झाला. पवन यांनी तिसरे लग्न अन्ना लेजनेवा यांच्यासोबत केले. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव  मार्क शंकर पवनोविच आहे. 


राजकारणात देखील सक्रिय


पवन कल्याण हे  राजकारणी देखील आहेत. 2008 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत.  पवन कल्याण यांनी 2014  मध्ये स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या या राजकीय पक्षाचे नाव जनसेना पक्ष आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: