Sonu Sood Income Tax Survey: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  आयकर विभागाने सोनू सूदवर 20 कोटींचा टॅक्स चोरीचा आरोप करत त्याच्या चॅरिटी ट्रस्ट द्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आता सोनू सूदची चौकशी ईडी, सीबीआयसह गृहमंत्रालयाच्या एफसीआरए डिव्हिजन देखील करणार असल्याची शक्यता आहे.  आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, सोनू सूदच्या लखनौ स्थित एका कंपनीवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप यासंदर्भात सोनू सूदनं मात्र आपली बाजू मांडलेली नाही.  



आयकर विभागाने आज म्हटलं की, लखनौमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातीस रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनूनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकाणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनौच्या समूहाने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा 65 कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून 1.8  कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशीही माहिती आहे. 


Sonu Sood Income Tax Survey : अभिनेता सोनू सूदच्या घराची आणि हॉटेलची आयकर विभागाकडून पाहणी, तब्बल 20 तास कारवाई


आयकर विभागानं सांगितलं की,  सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून 2.1 कोटी रुपये गोळा केले असून परदेशी नियमन कायद्याचे उल्लंघन केले आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, कर चुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत, असं आयकर विभागानं सांगितलं. 


सोनू सूदनं अनेक बोगस कंपन्यांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा 2 नोंदींचा वापर केल्याचं उघड झालंय. तसेच संबंधित सर्वांनीचं  बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलंय. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे, असे आयकर विभागाने सांगितले.


धार्मिक कामांमध्ये खर्च 


आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदनं आपला चॅरिटी ट्रस्ट 2 जुलै 2020 रोजी बनवला होता. या ट्रस्टमध्ये 18 कोटी 94 लाख रुपये आले. यापैकी एक कोटी 90 लाख रुपये विविध धार्मिक कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. तर 17 कोटी रुपये अजूनही ट्रस्टच्या खात्यामध्ये आहेत. आयकर विभागाच्या मते या खात्याची चौकशी करताना असं आढळून आलं आहे की, सोनू सूदच्या चॅरिटी ट्रस्टला परदेशातून देखील दोन कोटी एक लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.  









पुढील तपासात असे उघड झाले आहे की, हा गट बोगस बिलिंगमध्ये सहभागी आहे. आतापर्यंत सापडलेल्या अशा बोगस करारांचे पुरावे रु. 65 कोटी. बेहिशेबी रोख खर्चाचे पुरावे, भंगारची बेहिशेबी विक्री आणि बेहिशेबी रोख व्यवहाराचा पुरावा देणारा डिजिटल डेटा देखील सापडला आहे. तपासात उघड झाले आहे की, या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप/कंपनीने संशयास्पद परिपत्रक व्यवहारात जयपूर स्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत 175 कोटींचा घोटाळाही केला आहे.