Income Tax : Sonu Sood ने आम आदमीचा हात धरल्याने सर्व्हे? आयकरला सोनूवर भरवसा नाही काय?
गणेश ठाकूर, एबीपी माझा Updated at: 16 Sep 2021 11:36 PM (IST)
Sonu Sood Income Tax Survey : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली.