एक्स्प्लोर

Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली

Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi 6: सोनाली राऊतनं सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच 'बिग बॉस मराठी'ला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यासोबतच तिनं 'बिग बॉस मराठी'च्या प्रोडक्शन टीमवर गंभीर आरोपही केलेत. 

Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी सीजन 6' (Bigg Boss Marathi 6) अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या घरात फिनाले विक सुरू असून घराला टॉप 5 सदस्य मिळाले आहेत. 'बिग बॉस मराठी'चा सीझन 6 सुरू झाल्यावर घरात तब्बल 17 सदस्यांनी एन्ट्री घेतलेली. आता घरात 5 सदस्य उरलेत. घरात आलेल्या सदस्यांमध्ये 'बिग बॉस हिंदी' (Bigg Boss Hindi) करुन आलेल्या मराठमोळ्या मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या सोनाली राऊत (Sonali Raut) हिचाही समावेश होता. हिंदी बिग बॉस करुन आल्यामुळे मराठी बिग बॉसमध्ये सोनाली टॉप 10 स्पर्धकांमध्ये नक्कीच असणार असा अंदाज बांधला जात होता. पण, सोनाली सुरुवातीलाच घराबाहेर पडली. आता याच सोनाली राऊतनं सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच 'बिग बॉस मराठी'ला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यासोबतच तिनं 'बिग बॉस मराठी'च्या प्रोडक्शन टीमवर गंभीर आरोपही केलेत. 

सोनाली राऊत 'बिग बॉस मराठी'बाबत काय म्हणाली? (Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi)

सोनाली राऊतनं 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी'च्या घरातील काही त्रासदायक अनुभव शेअर केलेत. शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाल्यावर मराठी इंडस्ट्रीत चांगल्या संधी मिळतील, अशी तिला अपेक्षा होती. मात्र, घरात गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचं तिला जाणवलं. सुरुवातीच्या काही दिवसांतच तिला इन्फेक्शन झालं आणि ते हळूहळू वाढत गेलं. कालांतरानं त्या इन्फेक्शनचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागले आणि तिची चिंता अधिक वाढली, असं सोनालीनं सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सोनालीनं पुढे बोलताना सांगितलं की, 'बिग बॉस मराठी'च्या घरात इन्फेक्शन झाल्यावर तिनं शोच्या डॉक्टरांनाही याबाबत माहिती दिली. पण, त्यावर काही ठोस उपाय तिला देण्यात आला नाही. 'बिग बॉस मराठी', 'बिग बॉस हिंदी'च्या तुलनेत फारच लहान आहे. त्यात यावेळी घराची थीम 'रेशन'वर होती. शिक्षा म्हणून स्पर्धकांचं रेशन कमी केलं जायचं आणि कधी कधी बेड सोडून जमिनीवर झोपायलाही सांगितलं जात होतं, असं तिनं सांगितलं. त्याचप्रमाणे 'बिग बॉस मराठी'च्या घरात मोठे उंदीर असल्याचा आरोपही तिनं केलेला. तसेच, 'वीकेंड का वार'सारख्या भागात हिंदीत सलमान खान स्पर्धकांसाठी जेवण पाठवतात, पण मराठीत मात्र प्रोडक्शनकडून जेवण दिलं जातं आणि त्यात कधी कधी झुरळं आढळल्याचा धक्कादायक दावाही सोनालीनं केलाय.

शोमधून एलिमिनेट होण्याबाबत सोनाली म्हणाली की, तिला आधीपासूनच त्रास होत होता आणि योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं स्वतः हून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नंतर तिची एक्झिट झाली. तिनं हा प्रश्न रितेश देशमुख यांच्यापर्यंतही पोहोचवला होता, मात्र काही ठोस पावलं उचलली गेली नाहीत, असं तिचं म्हणणं आहे. तसेच, टास्कदरम्यान तिचा एक दात तुटल्याचा दावा तिने केला असून, त्याच्या उपचारासाठी तिला सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागलेत.

सोनाली राऊतनं 'बिग बॉस मराठी'ला धाडली लीगल नोटीस (Sonali Raut On Bigg Boss Marathi)

सोनाली राऊत म्हणाली की, "मी अँडमॉल आणि जिओ हॉटस्टार या दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांच्याकडे 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. तसंच मी ह्यूमन राइट्सलासुद्धा नोटीस पाठवली आहे. जिओ हॉटस्टार मला फक्त सांगत राहिले की आम्ही घरामध्ये इंटरनली चेक करतोय. आम्ही शिक्षा मिळायची तेव्हा खाली झोपायचो. तिथून मोठे उंदीर जायचे. तिथलं फर्निचर आम्ही सरकवायचो तेव्हा तिथे आम्हाला माउस ट्रॅप लावलेला दिसायचा आणि ज्यावर पाच पाच उंदीर चिकटलेले असायचे. मला जिओ हॉटस्टार कडून रिप्लाय आला पण त्यांनी माझे दावे खोटे ठरवले आहेत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 6 Winner Name: फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget