Sonali Bendre Cancer Hospital : 'चार वर्षानंतर...'; सोनालीनं दिली रुग्णालयाला भेट, आठवणींना उजाळा
चार वर्षानंतर सोनालीनं (Sonali Bendre) त्याच हॉस्पिटला भेट दिली, ज्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कॅन्सरचे उपचार करण्यात आले.
Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा (Sonali Bendre) चाहता वर्ग मोठा आहे. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं. सोनालीला 2018 मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचे (Metastatic Cancer) निदान झाले होते, त्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले होते, आता सोनाली कॅन्सरमुक्त झाली आहे. आता चार वर्षानंतर सोनालीनं त्याच हॉस्पिटला भेट दिली, ज्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कॅन्सरचे उपचार करण्यात आले. हॉस्पिटमधील एक व्हिडीओ सोनालीनं शेअर केला आहे.
सोनालीनं व्हिडीओ शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं. सोनाली तिच्या या अनुभवाला 'बिटरस्वीट' म्हणाली. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'ही तिच जागा आहे. चार वर्षानंतर... भीतीपासून ते सततच्या आशेपर्यंत, बरेच काही बदलले आहे, तरीही बरेच काही समान आहे. तिथे बसून रुग्णांना आत जाताना पाहिलं आणि मला दिसले की मी अशाच एका प्रवासातून गेलो होतो. केमोथेरपी सूट पाहिला, तीच वेटिंग रूम, फक्त चेहरे वेगळे होते. मला रुग्णांना सांगावेसे वाटले की, आशा ठेवा.'
सोनालीची पोस्ट:
View this post on Instagram
सोनालीचे चित्रपट:
सोनालीनं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सोनालीचं वय 19 वर्ष होते. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘मेजर साब’या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं. हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मिशन सपने, इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामे बाज या छोट्या पडद्यावरील शोमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तिनं या कार्यक्रमांचे परीक्षण केले होते. ‘द ब्रोकन न्यूज’या सारिजमधून सोनालीनं ओटीटीवर पदार्पण केलं. सोनालीनं या वेब सीरिजमध्ये अमिना कुरेशी ही भूमिका साकारली आहे.
हेही वाचा: