एक्स्प्लोर

Sonali Bendre Sohla Marathi Movie: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेमातली दमदार एन्ट्री! 'सोहळा'ची पहिली झलक दाखवत म्हणाली, अनेक वर्षांत..

कुटुंबीय आणि जवळचे आप्तस्वकीय यांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा दिवस म्हणजे मुलाने पहिल्यांदा वडिलांच्या चपला घालण्याचा दिवस. बालपणाच्या उंबरठ्यावरून पुरुषत्वाच्या दिशेने टाकलेले हे एक प्रतीकात्मक पहिले पाऊल असते.

Sonali Bendre Sohla Marathi Movie: सोनाली बेंद्रे यांनी सोहळा या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या म्हणून सोनाली बेंद्रे यांचा हा पहिलाच सहभाग असून, या पोस्टरमधून त्यांनी प्रेक्षकांना ‘पश्या’ या १३ वर्षीय मुलाची ओळख करून दिली आहे. आशा, कुटुंब आणि आयुष्याला आकार देणाऱ्या निवडींची गोष्ट सांगणारा सोहळा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.‘सोहळा’ म्हणजे उत्सव. एका लहान मुलाच्या आयुष्यातील अत्यंत हळवा आणि महत्त्वाचा असा हा एक संस्कार आहे. कुटुंबीय आणि जवळचे आप्तस्वकीय यांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा दिवस म्हणजे मुलाने पहिल्यांदा वडिलांच्या चपला घालण्याचा दिवस. बालपणाच्या उंबरठ्यावरून पुरुषत्वाच्या दिशेने टाकलेले हे एक प्रतीकात्मक पहिले पाऊल असते.

‘सोहळा’मधील पश्याची दिली ओळख करून

पश्यासाठी, हा दिवस म्हणजे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या उत्सवाची चाहूल आहे. नवीन कपडे, आशीर्वाद, मिठाई, हशा-आनंद, संपूर्ण कुटुंबासोबत गावातील मंदिरात जाणे आणि पहिल्यांदा वडिलांच्या चपला घालणे बालपणातून पुरुषत्वाकडे जाणाऱ्या या प्रवासाची सुरुवात त्याच्यासाठी एका मोठ्या उत्सवासारखी आहे. मात्र, तो तयार होण्याआधीच आयुष्य वेगळे वळण घेतं. पुढे त्याच्यासोबत काय घडतं, यापेक्षा तो कोणती निवड करतो, ही गोष्ट सोहळा सांगतो.

सोनाली बेंद्रे काय म्हणाल्या?

चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या म्हणून 'सोहळा'शी जोडले जाण्याबद्दल सोनाली बेंद्रे म्हणाल्या,“गेल्या अनेक वर्षांत मला अनेक गोष्टींसाठी माझं नाव जोडण्याची विनंती करण्यात आली आहे. पण मी फार क्वचितच त्यासाठी होकार दिला आहे. सोहळा हा त्या मोजक्या होकारांपैकी एक आहे. कारण हा असा चित्रपट नाही जो पाहून आपण विसरून जातो. एखादं पुस्तक शांतपणे आपल्यात बदल घडवून आणतं आणि बराच काळ आपल्यासोबत राहतं, तसा हा चित्रपट माझ्यासोबत राहिला. आणि मला जाणवलं की हीच भावनाहा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा म्हणजेच चित्रपट प्रस्तुत करण्यामागचा खरा अर्थ आहे. मी सोहळामध्ये अभिनेत्री म्हणून प्रस्तुतकर्ती नाही, तर या चित्रपटावर आणि सैकत यांनी निर्माण केलेल्या या कथेवर विश्वास असलेली व्यक्ती म्हणून त्याला प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.”

व्यक्तिमत्त्वाचा भाग बनणाऱ्या छोट्या-छोट्या क्षणांचा उत्सव

दिग्दर्शक सैकत बागबान म्हणाले,“सोहळा हा बालपण, मैत्री, कुटुंब आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनणाऱ्या छोट्या-छोट्या क्षणांचा उत्सव आहे. या संपूर्ण विश्वाच्या केंद्रस्थानी पश्या आहे आणि या पोस्टरच्या माध्यमातून त्याची प्रेक्षकांशी पहिली भेट घडत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत खास गोष्ट आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला आपल्या कथेवर स्वतःइतकाच विश्वास ठेवणारे सहकारी मिळावेत, अशी इच्छा असते. Rose Audio Visuals आणि सोनाली बेंद्रे माझ्या पहिल्या फीचर फिल्मला प्रस्तुत करत आहेत, ही गोष्ट या प्रवासाला एक वेगळंच प्रोत्साहन देणारी आहे. १६ ऑक्टोबरला सोहळा प्रेक्षकांनी चित्रपटगृहात अनुभवावा, याची मला आतुरता आहे.”

सोहळा सोनाली बेंद्रे प्रस्तुत करत आहेत. सैकत बागबान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती Rose Audio Visualsच्या बॅनरखाली गोल्डी बहल यांनी, तसेच Carryon Filmsच्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी केली आहे. चित्रपटात प्रविण दळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि Alessandra Whelan Merediz यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Cinepolisकडून या चित्रपटाचे संपूर्ण भारतातील थिएटर वितरण करण्यात येणार आहे. सोहळाचा ट्रेलर २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Embed widget