Ottawa Indian Film Festival : गेल्या एक दशकापासून कॅनडाची राजधानी असलेल्या Ottawa येथे Ottawa Indian Film Festival होत असतो. यंदाही या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारसोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. 


अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अक्षयच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. 


PHOTO : 'IFFLA'मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप


यामध्ये 'त्रिज्या' सिनेमाला नुकताच 'बेस्ट साउंड डिजाईन'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला 'यंग सिनेमा अवॉर्ड' हा पुरस्कार देखील अक्षय इंडीकरला मिळालेला आहे.


जागतिक सिनेमाच्या प्रतिष्ठित यादीत मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या 'स्थलपुराण'चा समावेश


भाषेची प्रदेशिकतेची बंधनं ओलांडून मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बाहेर घेऊन जाता आलं याचा आनंद आहे, सिनेमालाभाषा नसते तर सिनेमा हीच त्यांची भाषा असते असं एबीपी माझाशी बोलताना अक्षय ने सांगितले, सोबतच निर्माते, संजय शेटे, कॅमेरामन, सर्व टीमचं यश आहे असंही अक्षयनं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


बर्लिन चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या 'स्थलपुराण'चा डंका, रेड कार्पेटचा सन्मान


लॉस एंजेलिसच्या IFFLA फेस्टिवलमध्ये 'स्थलपुराण' क्लोजिंग फिल्म दाखवली गेल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं अक्षयचं भरभरुन कौतुक केलं होतं. इतकंच काय अनुराग स्वत: अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील गेला होता. अक्षयनं याबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. अनुरागनं अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडला. त्यात अक्षयने पुढील चित्रपट 'Construction' हा घेऊन येत असल्याचं देखील म्हणलं आहे.


WEB EXCLUSIVE मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरला आशिया यंग सिनेमा अवॉर्ड जाहीर, अक्षयसोबत फिल्मी गप्पा!


आजपर्यंत 28 ते 29 देशामध्ये अक्षय इंडीकर आणि त्यांची टीम त्यांचे चित्रपट जगभरातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेले आहेत. या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचं देखील अक्षयने सांगितलं.