PHOTO : 'IFFLA'मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप
मुळच्या सोलापूरचा असणाऱ्या अक्षय इंडीकरने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. आता अक्षयचा 'स्थलपुराण' हा चित्रपट मे महिन्यात लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 'लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'क्लोजिंग फिल्म' म्हणून दाखवला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया IFFLA फेस्टिवलनंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप स्वतः अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडणार आहे.
अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे.
अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्ये आता 'त्रिज्या' सिनेमाला नुकताच 'बेस्ट साउंड डिजाईन'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
अनेक संघर्षातून घडून आता इतर धडपड्या कलाकार, दिग्दर्शकांना नेहमीच मदत करणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप स्वतः अक्षयची मुलाखत घेत असल्याने हे मराठी चित्रपट आणि एकूणच तरुण दिग्दर्शक यांच्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
'उदाहरणार्थ नेमाडे' या वेगळ्या धाटणीच्या डॉक्यु-फिक्शन फिल्मपासून आपल्या चित्रपट कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारा अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र आणि अनोख्या चित्रपट शैलीमुळे जगभरात नावाजला गेला आहे. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला 'यंग सिनेमा अवॉर्ड' हा पुरस्कार देखील अक्षयला मिळालेला आहे.
पुढील नव्या सिनेमाची घोषणा लवकरच करणार असल्याचेही अक्षयने यावेळी संकेत दिले आहेत.