Harsha Richhariya: उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात दिसलेल्या एका सुंदर तरुणीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ही तरुणी एका व्हिडीओत ती स्वत:ला साध्वी असल्याचं सांगत होती. त्यानतंर हा व्हिडीओ देशभरात चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, देशभरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर मात्र या तरुणीबाबत वेगळी माहिती समोर आली आहे. या तरुणीचे नाव हर्षा रिछारिया असून तिने मी साध्वी नसल्याचं म्हटलंय.
काही तासांत हर्षा रिछारिया प्रसिद्ध
हर्षा रिछारिया या सुंदर तरुणीला सोशल मीडियावर सुंदर साध्वी, व्हायरल साध्वी म्हणून प्रसिद्धी मिळाली. सगळीकडे तिचीच चर्चा होती. या प्रसिद्धीमुळे तिचे इन्स्टाग्रामवर काही तासांत एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले. तिला काही तासांत साधारण पाच लाख लोकांनी फॉलो केलं आहे. असं असतानाच तिने मात्र मी साध्वी नसल्याचं सांगितलं आहे. मी एक साधी दिक्षा घेतलेली असून मला साध्वी असल्याचा टॅग देऊ नका, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.
हर्षा रिछारियाने नेमकं काय सांगितलंय?
सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या या तरुणीने एबीपी माझाशी बातचित करताना मी साध्वी नसल्याचं तिनं सांगितलं आहे. "मी लहानपणापासून साध्वी आहे, असं मी कुठेही सांगितलेलं नाही. मी आतादेखील साध्वी नाही. मी याबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे," असं तिनं सांगितलंय. तसेच मी सनात संस्कृती आणि धर्माकडे वळले आहे. मी अगोदर अँकरिंग, अभिनय, मॉडेलिंग केलेलं आहे. हे करून मी जर इकडे येत असेल तर त्यात चुकीचं काय आहे, असं हर्षाने म्हटलंय.
मी असं काहीही केलेलं नाही
तसेच मी साध्वी नाही. मी सनातन धर्माकडे आता कुढे वळत आहे. मला सोशल मीडियावर लोकांनी साध्वी हर्षा असा टॅग दिला आहे. हे योग्य नाही. साध्वी होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप साऱ्या परंपरा पाळाव्या लागतात. मी असं काहीही केलेलं नाही. मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे. अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं. गृहस्थी जीवनात असतानादेखील अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं, असंही हर्षाने स्पष्ट केलंय.
हेही वाचा :
ज्या खटल्याने देशाचं भविष्य बदललं, त्याच 'शाहबानो केस'वर चित्रपट येणार, यामी गौतम साकारणार भूमिका!