मोनिका बेदी ते ममता कुलकर्णी! एका घोडचुकीमुळे करिअरच संपलं, बॉलिवुडचे असे कलाकार जे बघता बघता झाले गायब
Bollywood Celebs Scandals : बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, ज्यात एखादी व्यक्ती एका रात्रीत स्टार होते. तर एखाद्या कलाकाराचे करिअर एका क्षणात संपते. बॉलिवुडमधील बरेच कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवुडमध्ये जम बसवला होता. मात्र त्यांच्या काही चुकांमुळे ते नंतर बाहेर फेकले गेले. त्यांचे करिअर संपले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाइनी आहुजा हा एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात होता. त्याने ल्महे, गँगस्टर अशा अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. मात्र त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आलं होतं. यातच त्याचं करिअर संपलं.
ममता कुलकर्णी या अभिनेत्रीने आपला काळ गाजवला. 90 च्या दशकात तिने बड्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलेली होती. अजूनही तिचे देशभरात चाहते आहेत. मात्र एका ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीवर आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात नंतर ती चांगलीच अडकली आणि तिचे करिअर संपले.
मोनिका बेदी ही एकेकाळी बॉलिवुडमधल्या टॉपच्या अभिनेत्र्यांपैकी एक होती. मात्र ती अंडरवर्ल्डचा डॉन अबू सालेम याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती, असं म्हटलं जातं. याच कारणामुळे तिचे करिअर संपले. मोनिका बेदीने खोट्या कागदपत्रांच्या मदतीने पोर्तुगालमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तिला अटक करण्यात आलं होतं. तुरुंगातून सुटल्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिला यश आले नाही.
बॉलिवुड स्टार सूरज पांचोली याचे करिअर जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे संपले. जिया खान आणि सूरज पांचोली यांनी एकमेकांना डेट केलेलं आहे. मात्र नंतर जिया खानने आत्महत्या केली होती. या प्रकरणात सूरज पांचोली चांगलाच अडकला होता. यातच त्याचे करिअर संपले.
फरदीन खान हा चेहरा देशातील सर्वांनाच माहिती आहे. त्याने अनेक बड्या चित्रपटांत काम केलेलं आहे. प्रेम अगम, जंगल असे काही हिट चित्रपट आहेत, ज्यामुध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मात्र त्याच्यावर 2001 साली कोकेन ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. या प्रकरणानंतर त्याचं करिअर संपलं.