करिना कपूर ते अली फजल! बॉलिवुडचे 'हे' 4 स्टार्स टॉलिवुडमध्ये नशीब आजमावणार, मोठ्या चित्रपटांत झळकणार!
Bollywood Stars: 2024 या साली टॉलिवुड बॉलिवुडपेक्षा भारी ठरलं. दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. ही बाब लक्षात घेऊन आता बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यात करिना कपूरपासून ते अली फजल यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय ओबेरॉय (टॉक्झिक) – ‘फायटर’ तसेच ‘गुड़गांव’ अशा चित्रपटांत दिसलेला अभिनेता अक्षय ओबेरॉय हा टॉलिवडूमध्ये पदार्पण करणार आहे. तो टॉक्झिक या चित्रपटात दिसेल. या चित्रपटात वश, कियारा आडवाणई, नयनतारा तसेच हुमा कुरेशी अशा दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
अली फज़ल (ठग लाईफ) – ‘मिर्झापूर’ ‘व्हिक्टोरिया’ तसेच ‘अब्दुल’ अशा बड्या वेब सिरिजमध्ये छाप सोडणारा अली फजल आता दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो याच वर्षी रिलिज होणाऱ्या ठग लाईफ या चित्रपटात दिसणार आहे.
करीना कपूर खान (अनटायटल्ड प्रोजेक्ट) - बॉलिवुडची क्विन म्हणून ओळखली जाणारी करिना कपूर लवकरच दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत डेब्यू करणार आहे. तिने एक मोठा चित्रपट साईन केल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र करिना कपूरनेदेखील मी टॉलिवुडमध्ये पदार्पण करत असल्याचं सांगतलं आहे.
शनाया कपूर (वृषभा) - शनाया कपूर वृषभा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुड आणि टॉलिवुड अशा सिनेसृष्टीत डेब्यू करणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार मोहनलाल याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात मोहनलाल यांच्याशिवाय रोशन मेका, गरुड़ राम, सिमरन आणि श्रीकांत यांच्यासह अनेक स्टार्स असणार आहेत. बालाजी टेलिफिल्मतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. वृषभा एक बिग बजेट फिल्म असून ती तेलुगू, मल्याळम भाषेत असेल.