एक्स्प्लोर

Vaishali Samant : गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!

Vaishali Samant : फक्त गायिकाच नव्हे तर, संगीतकार, गीतकार असा वैशालीचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे.

Vaishali Samant : आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. आणि फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ‘सांग ना’ या गाण्याच्या माध्यमातून वैशाली एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘टी सिरीज’ आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं सोलो गाणं आहे आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही खऱ्या आयुष्यातली नवरा-बायकोची जोडी या गाण्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 'सांग ना...' या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न ऑफिसमधली असली, तरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे. त्यामुळं हे गाणं रसिकांना वेगळाच अनुभव देणारं ठरेल.

गायिका, संगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले!

'सांग ना...' या गाण्याबद्दल बोलताना वैशाली सामंत म्हणाल्या, ‘फिल्मी आणि नॉन फिल्मी अश्या दोन प्रकारचं संगीत असतं, जेव्हा तुम्ही नॉन फिल्मी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर इंडिपेंडंट गाणं करता, तेव्हा ते गाणं कसं असावं याचे स्वातंत्र्य आपल्याला असते आणि ते गाणं चांगलं करण्याची जबाबदारीही आपलीच असते. माझ्यासाठी गाणं म्हणजे एक दागिना आहे. त्याची जडण घडण कशी असावी, तो दागिना सुंदर दिसण्यासाठी जशी नजकात महत्वाची आहे तसेच गाण्याचे आहे. जेव्हा सांग ना.. मी ऐकलं तेव्हा असंच वाटलं की, या प्रकारचं गाणं या आधी माझ्याकडून नाही झालंय. सांग ना.. मध्ये शब्द, ठेका, आणि एक छान ट्रान्स असलेली चाल आहे आणि एका मुलीचा हट्ट आहे, स्वताच्या प्रियकरासाठी ती गाताना कसे एक्सप्रेशन आहेत, हे सगळं बघून मला असं वाटलं की, हे मी गावं. ‘टी-सिरीज’ला हे गाणं आवडलं आणि त्यांनी मलाच या गाण्याची निर्मिती करण्यास सांगितली आणि त्यामुळेच मी गायिका, संगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले. ‘ऐका प्रॉडक्शन’ या नावच एक मुझिक प्रॉडक्शन लेबल सुरु केलं आहे.’

वैशाली सामंत यांचा मी खूप मोठा फॅन : अभिजीत खांडकेकर

'सांग ना...' हे गाणं खऱ्या अर्थानं अनोखा आनंद देणारं असल्याची भावना व्यक्त करत अभिजीत खांडकेकर म्हणाला की, सुखदा आणि मी फार कमी वेळा एकत्र आलो आहोत, पण म्युझिक अल्बमसाठी आम्हाला एकत्र आणण्याची किमया 'सांग ना...'नं केली आहे. आम्हाला एकत्र पाहण्याची आमच्या चाहत्यांची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली आहे. वैशाली सामंत यांचा मी खूप मोठा फॅन आहे. माझ्या पहिल्या चित्रपटातील गाण्याला त्यांचा आवाज होता. लोकप्रियतेचे बरेच विक्रम आपल्या नावे करणाऱ्या गायिकेनं अल्बमसाठी विचारणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भंडारेंनी हे गाणं खूप सुंदररीत्या शब्दबद्ध केलं आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 14 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget