लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानचा डान्स तुफान व्हायरल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
चाहते तिच्या या डान्सवर मजेशीर कमेंट करत आहेत. सुनिधी शकिराची नक्कल करत असल्याचं म्हणत काहींनी तिला सुनावलंय.

Sunidhi Chauhan Dance Viral: पूर्वीच्या काळात एखाद्या गायकाचे अंगविक्षेप, अतिरंजीत हातवारे हे त्याचा दोष समजला जायचा. पण आता चित्र बदललं आहे. एखाद्या गाण्यावर समोरच्याला थिरकायला लावायचं असेल तर गायकाला तो माहोल तयार करावा लागतो. प्रसंगी स्वतः नाचावं लागतं. अशाच एका कॉन्सर्टची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या कॉन्सर्टला बॉलीवूडचे तारे तारकाही हजेरी लावत आहेत. नुकताच पुण्याला सुनीधीचा कॉन्सर्ट झाला. दरम्यान , कॉन्सर्टमधील एका परफॉर्मन्समुळे सुनिधी चौहान ट्रोल होताना दिसतेय. 'कमली कमली ' तिचं गाजलेलं गाणं ती परफॉर्म करत होती. परफॉर्म करत असताना ती स्टेजवर थिरकली आहे. पण तिच्या विचित्र डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या या डान्सवर मजेशीर कमेंट करत आहेत. सुनिधी शकिराची नक्कल करत असल्याचं म्हणत काहींनी तिला सुनावलंय.
कॉन्सर्टमध्ये नेमकं काय झालं?
एखाद्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करायचं म्हणजे समोरच्याला त्या गाण्याचा पूर्ण फील देण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. पण कधीतरी हे प्रयत्न फसतात आणि क्षणार्धात ती व्यक्ती व्हायरल होते याची कितीतरी उदाहरणं सोशल मीडियावर दिसतात. असाच एक प्रकार सध्या गायिका सुनिधी चौहान हिच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घडलाय. एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहान तिचं गाजलेलं 'कमली कमली ' गाणं परफॉर्म करत होती. तिने गुलाबी रंगाचा टू पीस ड्रेस घातला होता. सुनिधी एकदम जोशमध्ये गाणं म्हणत होती. गाण्यातला जोश प्रेक्षकांना यावा यासाठी सुनिधी डान्स करू लागली. पण डान्स करताना इतक्या विचित्र स्टेप ती करायला लागली की सगळ्या स्टेप फसल्या. सुनिधीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेड लागलंय का हिला? हे काय होतं ? ' डॉक्टरने काय सांगितलं कधीपर्यंत ठीक होईल ही ' अशा कमेंट्स करत सुनिधीला रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी शकिरा होण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत तिची खबर घेतली आहे. आवाज इतका चांगला आहे. एवढा ड्रामा करायची काय गरज आहे ?, हॉलीवुड गायिकांसारखं वागणं जमलं नाही अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
या परफॉर्मन्सनंतर सुनिधीने अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोबतही तुफान डान्स केला. या डान्सचे कौतूक होत आहे.सुनिधी चौहान प्रसिद्ध बॉलीवूड गायिका आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती गाणं गाते.परफॉर्म करते. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी शस्त्र सिनेमातून तिला ब्रेक मिळाला. अनेक चित्रपटांमध्ये तिच्या नावावर हिट गाणी आहेत.























