Salman khan on Sidharth Malhotra Kiara: दीपिका-रणवीरनंतर सिद्धार्थ-कियाराही दुसऱ्यांदा पालक होणार? 'बिग बॉस 20'मध्ये सलमान खानने दिली हिंट, म्हणाला...
Sidharth Malhotra Kiara Advani: सिद्धार्थ आणि कियारा दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

Sidharth Malhotra Kiara Advani Expecting Second Baby: सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) सध्या आपल्या आगामी सिनेमा 'द वन: फोर्स ऑफ फॉरेस्ट'मुळे चर्चेत आहे. या सिनेमातील छठ हे गाणं प्रचंड हिट ठरलं. काही दिवसांपासून या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत असल्याचं दिसत आहे. फिल्मच्या प्रोमोशनमध्ये सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी व्यस्त आहेत. अलिकडेच दोघेही फिल्मच्या प्रोमोशनसाठी तमन्ना आणि सिद्धार्थ 'बिग बॉस 20'मध्ये (Bigg Boss 20) पोहोचले होते. यावेळी सिद्धार्थने प्रोफेशनलसह पर्सनल लाइफवर चर्चा केली. दरम्यान, आता सिद्धार्थ आणि कियारा (Kiara Advani) लवकरच दुसऱ्या बेबीसाठी प्लॅन करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिद्धार्थ कियारावर सलमान खान नेमकं काय म्हणाला? (Sidharth Malhotra Kiara Advani Expecting Second Baby)
'बिग बॉस 20'च्या विकेंड का वारमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. भाईजानने यावेळी खुलासा केला की, तो बऱ्याच काळापासून सिद्धार्थवर लग्नासाठी दबाव टाकत होता. पण तरीही सिद्धार्थने आपले नाते प्रायव्हेट ठेवले होते. सलमानने सिद्धार्थला हे नाते प्रायव्हेट ठेवण्यामागचे कारण विचारले. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला की, हे गुपित ठेवायचे होते. योग्य वेळ आल्यानंतर हे गुपित त्यांना उघड करायचे होते. यावर सलमान खान म्हणाला की,'हे गुपित आता बाळामध्ये आहे (वो राज अब बच्चे में हैं)', असं सलमान खान सिद्धार्थची चेष्टा करत म्हणाला.
जुलै 2025 साली सिद्धार्थ आणि कियाराला लेक सराया मल्होत्रा झाली. काही महिन्यांनंतर दोघांनीही लेकीचं नाव उघड केलं. वडील झाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने आपला आनंद व्यक्त केला. त्याने सांगितलं की, त्याची लेक आता 15 महिन्यांची झाली आहे. लेक आता नवनवीन शब्द शिकत आहे. सलमानने गंमतीने म्हटलं की, 'आशा आहे की, लवकरच दोघेही दुसऱ्यांदा पालक होतील'. आता सलमान खानच्या या गंमतीला लोक हिंट म्हणून पाहत आहेत. सोशल मीडियावरील युझर्स, सिद्धार्थ आणि कियाराला लवकरच दुसरं मुल होणार, असे तर्क लावत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ आणि किआरा दोघांनीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 'बिग बॉस 20'वरील दोघांमधील संवाद हा मस्ती मजाकपुरताच मर्यादित राहिला, असंही म्हटलं जात आहे.
सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह या कपलने दुसऱ्या लेकीचं स्वागत केलं आहे. दुआनंतर या कपलला मुलगी झाली. दोघांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली. दरम्यान, यानंतर आता सिद्धार्थ आणि कियारा गुडन्यूज देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:





















