एक्स्प्लोर

Ata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवर 10 सप्टेंबरपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’; तब्बल 11 वर्षांनंतर सिद्धार्थ दिसणार छोट्या पडद्यावर

Ata Hou De Dhingana : सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ द्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

Ata Hou De Dhingana : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. याच वाहिनीवर येत्या 10 सप्टेंबरपासून ‘आता होऊ दे धिंगाणा' हा भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय राहत नाही. स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येईल. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितिक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर, बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमतीही या मंचावर उलगडणार आहेत.   

सिद्धार्थ जाधव करणार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन : 

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधव करणार असून तब्बल 11 वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी तो अतिशय उत्सुक असून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची मी वाट पहात होतो असं सिद्धार्थ म्हणाला. पुढे तो म्हणाला, "या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. प्रेक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडतं. आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही तर यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांना नवं सरप्राईज देतील. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपली छाप पाडणारा एक कार्यक्रम असावा. हा कार्यक्रम त्याच धाटणीचा आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रवाह परिवार या शो ला वेगळ्या उंचीवर नेतो. या सगळ्यांकडून नवी ऊर्जा मिळते. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय."

सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर 'होऊ दे धिंगाणा' हा कार्यक्रम नक्की पाहा. स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget