Siddhant Chaturvedi, Navya Naveli Nanda : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या 'गेहराईंया' (Gehraiyaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. चित्रपटातील सिध्दांत आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीनं अनेकांचं लक्ष वेधलं. पण चित्रपटाबरोबरच सिद्धांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकतीच सिद्धांतनं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नातीच्या म्हणजेच  नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) च्या एका फोटोवर खास कमेंट केली. या कमेंटमुळे आता सिद्धांतचं नाव नव्या नवेली नंदा सोबत जोडलं जात आहे. 


नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. नव्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नव्यानं यूनाइटेड नेशनसोबतच्या तिच्या नव्या प्रोजेक्टचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिचे काही कॅनडीड फोटो आहेत. सिद्धांतनं नव्याच्या या फोटोवर हार्टच्या इमोजीची कमेंट केली. त्यामुळे आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न सिद्धांत आणि नव्याच्या चाहत्यांना पडला आहे. 






'गल्ली बॉय' या चित्रपटातील सिद्धांतच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्याचा नुकताच गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, आनन्या पांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली. बंटी और बबली 2 या चित्रपटातील सिद्धांतच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला पती रितेशपासून विभक्त, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती


Gehraiyaa : दीपिकासोबतचा किसिंग सिन पाहिल्यानंतर सिद्धांतच्या काकांची भन्नाट रिअॅक्शन ; म्हणाले...


Samantha : फिटनेस फ्रिक समंथा करत होती 'या' आजाराचा सामना; सोडावा लागला होता चित्रपट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha