1. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सर्व जागांसाठी आज मतदान, तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात जनता देणार कौल


Elections 2022 : आज उत्तर प्रदेशसह गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमधील सर्वच जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानाच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे मतादानासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरच पाहायला मिळणार आहे. नेमकी कोणत्या राज्यात काय परिस्थिती ते पाहुयात....


2. 2022 मधील इस्रोची पहिली यशस्वी झेप, EOS-4 उपग्रहाचं PSLV C-52च्या मदतीनं प्रक्षेपण


ISRO PSLV C-52 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षीच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहासह इतर दोन लहान उपग्रहदेखील होते. सकाळी 5.59 वाजता पीएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले. 


इस्रोने सांगितले की पीएसएलव्ही C52 ची रचना 1,710 किलो EOS-04 उपग्रह 529 किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवण्यासाठी केली आहे.  PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे.


3. राफेल विमानांची शेवटची तुकडी पुढील आठवड्यात भारतात, 2016 साली सरकारने केली होती 36 विमानांची खरेदी


4. हिजाब बंदीमुळे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन, हिजाबप्रकरणावर अमेरिकन IRF राजदूत रशाद हुसेन यांची प्रतिक्रिया



5. 22 हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावरुन राजकारण तापलं, शेअर बाजारावर परिणाम होणार का? याकडे लक्ष


गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला. तब्बल २८ बँकांना शिपयार्ड कंपनीनं २२ हजार ८४२ कोटींचा चुना लावलाय. CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


6. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आज आंदोलन


Congress vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आज आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपने माफी मागावी, यासाठी नाना पटोलेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, भाजपने देखील काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले आहे. या आंदोलनाला भाजपने जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आज राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


7. किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप सुजीत पाटकर यांनी फेटाळले, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत


8. राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 24 तासांत 9 हजार 815 रुग्णांनी केली कोरोनावर मात 


9. प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल


10. सुरेश रैना, इशांत शर्मा, हरभजनकडे आयपीएल फ्रँचाईझींची पाठ, आयपीएलच्या लिलावात तिघेही अनसोल्ड