Coronavirus New Cases Today : सध्या देशावरील कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. गेल्या 24 तासात देशात 34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 44 हजार 877 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामानाने रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
आत्तपर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 31 हजार 421 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यातील 4 कोटी 16 लाख 77 हजार 641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 9 हजार 11 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाख 78 हजार 882 एवढी आहे. सध्या देशात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 3.19 टक्के आहे. काल दिवसभरात 91 हजार 930 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील सुरू आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे. या वयोगटातील मुलांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सरकारच्या वतने देखील वेळोवेळी लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटी 95 लाख 87 हजार 490 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
भारतात सुमारे 40 दिवसांनंतर, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी राहिली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा 97.55 टक्के आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमीत लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता आणि 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता. या वर्षी 26 जानेवारीला कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींच्या पुढे गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: