एक्स्प्लोर

Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन

Shreyas Talpade On Shah Rukh Khan: फराह खानच्या कुकींग व्लॉगमध्ये श्रेयस तळपदे काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यानं शाहरुख खाननं केलेल्या मदतीचा भावूक करणारा किस्साही सांगितला. 

Shreyas Talpade On Shah Rukh Khan: मराठी इंडस्ट्रीतल्या (Marathi Film Industry) अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आपलं नाव कमावलंय. त्यापैकीच एक श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). श्रेयसनं मराठीतल्या टेलिव्हिजनच्या पडद्यापासून ते मराठी सिनेमांपर्यंत (Marathi Movie) अनेक प्रोजेक्ट्स केलेत. त्यासोबतच त्यानं अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. श्रेयस तळपदेनं निर्मिती श्रेत्रातही पाऊल टाकलं असून त्याचा आगामी सिनेमा 'मर्दिनी' (Mardini) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसेच, त्यानं बॉलिवूडला हादरवणारा साऊथ सिनेमा (South Movie) 'पुष्पा'च्या (Pushpa) दोन्ही पार्ट्सचं हिंदी डबिंग केलेलं. नुकताच फराह खान (Farah Khan) कुकींग व्लॉगमध्ये आपला कुक दिलीपसोबत श्रेयस तळपदेच्या घरी गेलेली. फराह खानच्या कुकींग व्लॉगमध्ये श्रेयस तळपदे काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यानं शाहरुख खाननं केलेल्या मदतीचा भावूक करणारा किस्साही सांगितला. 

अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी बॉलिवूडची निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान (Bollywood Producer Choreographer Farah Khan) गेलेली. तिच्या 'कुकिंग व्लॉग'मध्ये श्रेयस तळपदेच्या घराची झलक तिनं दाखवली. त्यावेळी गप्पांच्या ओघात श्रेयस तळपदेनं सांगितलं की, 'ओम शांती ओम' सिनेमा त्याच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानं सांगितलं की, याच सिनेमामुळे त्याला मुंबईत स्वतःचं पहिलं घर विकत घेणं शक्य झालं.

फराह खाननं नुकताच श्रेयस तळपदेसोबतचा कुकींग व्लॉग शेअर केलाय. फराह खान आणि श्रेयस तळपदे यांनी 'ओम शांती ओम'मध्ये एकत्र काम केलंय. त्यामुळे फराह खानला भेटल्यानंतर श्रेयसनं 'ओम शांती ओम' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर फराह खान आणि शाहरुख खाननं त्याला घर खरेदी करण्यास कशी मदत केली, याबद्दल सांगितलं. 

शाहरुख खाननं केलेल्या मदतीबाबत श्रेयस तळपदे काय म्हणाला? (Shreyas Talpade On Shah Rukh Khan)

श्रेयस म्हणाला की, "आमचं पहिलं घर कोणामुळे झालं, माहिती आहे का? ते 'ओम शांती ओम' सिनेमामुळे...", श्रेयसचं हे वाक्य ऐकताच फराहला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, 'अरे! मी त्या घरी आले होते. ते घर खूपच सुंदर होतं..."

श्रेयस तळपदे यानं घर घेण्याचा किस्सा सांगताना म्हणाला की, "त्यावेळी मी बँकेत गेलेलो, पण मी होम लोनसाठी पात्र नव्हतो. बँकेतील अधिकाऱ्यांनी मला विचारलं की, तू आणखी कोणता सिनेमा करतोयस? तेव्हा मी 'ओम शांती ओम'चं नाव सांगितलं. त्यांनी विचारलं, या सिनेमात कोण आहे? मी म्हणालो, शाहरुख खान. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक कोण आहेत, असं विचारलं. मी फराह खान असं म्हटलं. मग त्यांनी विचारलं, त्यांच्याकडून एक पत्र मिळू शकेल का?"

फराह खान, शाहरुखनं केलेली कर्ज मिळवून देण्यासाठी मदत 

श्रेयसनं पुढे बोलताना कर्ज मंजूर करून घेण्यासाठी फराह आणि शाहरुख खान या दोघांनी त्याला कशी मदत केली, असं विचारलं. तो म्हणाला की, "मी फराह खानला फोन केलेला आणि दोन दिवसांच्या आतच तिनं मला शाहरुख खानकडून एक पत्र मिळवून दिलं. त्याच संध्याकाळी कर्ज मंजूर झालं..." हे ऐकून फराहनं आनंद आणि विनोदाच्या सुरात प्रतिक्रिया दिली, "मला खूप आनंद झालाय, कारण 'ओम शांती ओम'साठी आम्ही तुला नक्कीच बऱ्यापैकी पैसे दिले असणार..."

फराह खान दिग्दर्शित आणि 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली निर्मित 'ओम शांती ओम' सिनेमात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली होती; या चित्रपटातून दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आणि त्याला त्यातील संगीत व अविस्मरणीय संवादांसाठी प्रचंड प्रशंसा मिळाली.

फराह खान दिग्दर्शित आणि 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली निर्मित 'ओम शांती ओम' सिनेमात शाहरुख खाननं दुहेरी भूमिका साकारलीय. या सिनेमातून दीपिका पदुकोणनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. 2007 मध्ये रिलीज झालेला सिनेमा त्या वर्षातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या हिट सिनेमांपैकी एक ठरला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: 'केतनला मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती...'; पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची पोस्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget